पदवीधरसाठी ३१ उमेदवार निवडणूक मैदानात, दोन संदीप जोशी आणि दोन अभिजीत वंजारी!

एकाच नावाचे दोन उमेदवार झाल्याने भाजप आणि काँग्रेसची डोकेदुखी वाढणार

0

नागपूर : नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणूकीत एकूण ३१ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. काल उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. त्यानुसार काल एकूण ३१ उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. महत्वाची बाब म्हणजे या 31 उमेदवारांमध्ये दोन संदीप जोशी आणि दोन अभिजीत वंजारी आहेत.त्यामुळे भाजप आणि काँग्रेसची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. तर विदर्भवादी नितीन रोंधे आणि वंचित बहुजन आघाडीकडून राहुल वानखेडे निवडणूक रिंगणात उतरले आहेत. 

भाजपचा पारंपरिक मतदारसंघ असलेल्या नागपूर पदवीधर मतदारसंघात यंदा भाजपने उमेदवार बदलत महापौर संदीप जोशी यांना संधी दिली आहे. तर काँग्रेसकडून अभिजीत वंजारी यांना मैदानात उतरवण्यात आलं आहे. त्यामुळे ही लढत चुरशीची होईल, असा अंदाज स्थानिकांकडून व्यक्त होत आहे. दरम्यान, काल उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण 31 उमेदवारांनी आपला अर्ज सादर केला आहे. त्यात संदीप दिवाकर जोशी आणि संदीप रमेश जोशी, अशा नावाचे दोन, तर अभिजीत गो. वंजारी आणि अभिजीत रविंद्र वंजारी, अशा नावाचे दोन उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. एकाच नावाचे 2 उमेदवार झाल्याने भाजप आणि काँग्रेसची डोकेदुखी वाढणार आहे. दरम्यान, आज उमेदवारी अर्जाची छननी होणार आहे. त्यानंतर 15 नोव्हेंबर ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख आहे. त्यामुळे भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांच्या नावात साधर्म्य असलेले उमेदवार आपला अर्ज मागे घेणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. त्या दोन्ही उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेतला नाही. तर मात्र भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

राष्ट्रवादीची नाराजी दूर करण्यात काँग्रेसला यश

दुसरीकडे काँग्रेसला काहीसा दिलासा मिळाला आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसची नाराजी दूर करण्यात काँग्रेसला यश आलं आहे. नागपूर पदवीधर निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसनं स्वतंत्र उमेदवार देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली होती. पण अखेर काँग्रेस नेत्यांच्या मध्यस्थीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसनं उमेदवार देण्याचा निर्णय मागे घेतला. असं असलं तरी आता शिवसेना नाराज असल्याचं बोललं जात आहे. कारण अभिजीत वंजारी यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आमंत्रण देण्यात आलं नसल्याचं शिवसेना नेत्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे राज्यात सत्तेत एकत्र असलेल्या शिवसेनेची नाराजी काँग्रेसकडून आता कशी दूर केली जाणार हे पाहावं लागणार आहे.

निवडणूक कार्यक्रम

निवडणूक जाहीर : 5 नोव्हेंबर
उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस : 12 नोव्हेंबर
अर्ज छाननी : 13 नोव्हेंबर
उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस : 17 नोव्हेंबर
मतदानाचा दिनांक : 1 डिसेंबर मतदान (सकाळी 8 ते सांयकाळी 5 )
मतमोजणी : 3 डिसेंबर
निवडणूक प्रक्रिया संपण्याचा दिवस : 7 डिसेंबर

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.