आमदार अमोल मिटकरी यांच्यासह अनेक जणांवर गुन्हा दाखल

अकोल्यातील अकोटमधील कुसाटा गावात विधान परिषद आमदार अमोल मिटकरी यांची भव्य मिरवणूक

0

अकोला : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शुक्रवारी देश आणि राज्यात सर्वत्र साजरी झाली. कोरोना प्रादुर्भावामुळं राज्य सरकारने शिवजयंतीसाठी काही नियमावली लागू केली होती. पण काही ठिकाणी सरकारने घालून दिलेले नियम पायदळी तुडवल्याचे चित्र अकोल्यात पाहायला मिळाले. अकोल्यातील अकोट तालुक्यातील कुसाटा गावात विधान परिषद आमदार अमोल मिटकरी यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीसाठी शेकडो लोक उपस्थित होते. कोरोना नियमांचे उल्लंघन केल्यामुळे अमोल मिटकरी यांच्यासह अनेक जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

सोशल डिस्टन्सिंगचे नियम पायदळी

आमदार अमोल मिटकरी यांच्या उपस्थितीत शिवजयंतीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीला शेकडो लोक उपस्थित होते. या मिरवणुकीत सरकारने घालून दिलेल्या कोरोना नियमांचे उल्लंघन करण्यात आले. मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पायदळी तुडवण्यात आले. या प्रकरणी दहीहंडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार अमोल मिटकरी यांच्यासह 300 ते 400 जणांवर हा गुन्हा दाखल झाला.

मिटकरींच्या पडळकरांवरील टीकेला खोतांचे प्रत्युत्तर

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर विरुद्ध राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्यातील वाद आता शिगेला पोहोचला. अहिल्यादेवींच्या पुतळ्याच्या उद्घाटनावरुन सुरू झालेले हे वाकयुद्ध अद्याप थांबण्याचे नाव घेत नाही. मिटकरी आणि पडळकर यांच्यातील वादात आता माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी उडी घेतली आहे. सदाभाऊ खोत यांनी अमोल मिटकरी यांनी पडळकरांवर केलेल्या टीकेला जोरदार प्रत्युतर दिले आहे. अमोल मिटकरी यांनी आरोप केला होता की, दारु विकली म्हणे. मी म्हणतोय गांजाही विकत होतो. तू येतोस का चिलीम लावायला, असा टोला सदाभाऊ खोत यांनी लगावला. इतकेच नाही तर आम्ही सगळे केले, पण सामान्य माणसांचे खिसे कापले नाहीत, असा पलटवारही खोतांनी लगावला आहे. “तू बोलतो किती? तुझी औकात किती? तू आहेस केवढा? मला एक पत्रकार म्हणे बोला त्याच्यावर, मी म्हटले, माझ्यासवे लढाया वाघास बोलवावे, कुत्र्यास फाडण्याचा माझा स्वभाव नाही. समोर कॅमेरा असल्याने मी नाव न घेता बोलणार आहे”, अशा शब्दात अमोल मिटकरी यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला होता. त्याला आता खोतांनी प्रत्युत्तर दिले आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.