30 एप्रिलपर्यंत शाळा सुरु ठेवण्याचा निर्णय अखेर मागे

0

मार्चमध्ये परिक्षा झाल्यानंतरही 30 एप्रिलपर्यंत शाळा सुरु ठेवण्याचा निर्णय अखेर मागे घेण्यात आला आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधीमंडळात याबाबत घोषणा केली. यावेळी अधिका-यांना बोलावून सुचना देणार असल्याचे सांगितले.

परिक्षा संपल्यानंतरही 30 एप्रिलपर्यंत शाळा सुरु ठेवण्याचा शिक्षण विभागाने निर्णय घेतला होता. या निर्णयाला शिक्षकांसह पालकांनीही विरोध केला होता. मात्र आता हा निर्णय मागे घेण्यात आला आहे. केंद्र शासनाच्या आदेशानेच हा निर्णय घेण्यात आल्याचे विनोद तावडे यांनी यावेळी सांगितले. मात्र सध्या तो मागे घेण्यात येत असून, याची गरज भासल्यास पुढील शैक्षणिक वर्षात याची अंमलबजावणी केली जाईल, असेही तावडे म्हणाले.

परिक्षा झाली मार्चच्या अखेर मुलांना शाळेला सुट्या लागतात. त्यानंतर 1 मे रोजी निकाल लागतो आणि महिनाभर शिक्षकांनाही सुट्या दिल्या जातात. असे शाळेचे वार्षिक नियोजन असते. मात्र या वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय शिक्षण खात्याने घेतला होता. 1 ते 9 वी राज्यमंडळाच्या शाळा 1 मे पर्यंत सुरु ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. या वेळेत मुलांसाठी विविध उपक्रम, शिबीरे राबवण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.