चुलत भावाने केला बहिणीवर बलात्कार, आरोपीला अटक

0

घरासमोर खेळणा-या अल्पवयीन मुलीचा बलात्कार केल्याच्या आरोपाप्रकरणी एका 14 वर्षीय मुलाला अटक करण्यात आली आहे. पुण्यातील देहू रोड येथे शुक्रवारी ही घटना घडली. आरोपी मुलगा हा पिडीत मुलीचा चुलत भाऊ असल्याचे सांगितले जात आहे.

शुक्रवारी पिडीत मुलगी घरासमोर खेळत होती. त्यादरम्यान सकाळी दहा वाजेच्या सुमारास आरोपी मुलगा तिला घरी घेऊन गेला आणि तिच्यावर अत्याचार केला, हा प्रकार आईच्या लक्षात आल्यानंतर आई धावत तिथे गेली असता मुलाने तिथून पळ काढला, असे पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

या प्रकरणी पिडीत मुलीच्या आई-वडिलांनी देहूरोड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.