3 विषयांत नापास झाल्याने 18 वर्षीय तरुणीने केली आत्महत्या

0

बीएच्या प्रथम वर्षात शिकत असलेल्या एका विद्यार्थीनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नाशिकच्या अंबड येथे घडली. 3 विषयात नापास झाल्याने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

मयूरी सोनवणे (18) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. तिने राहत्या घरी ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयूरी कला शाखेच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत होती. ती 3 विषयांत नापास झाली होती. मैत्रीणी आपल्याही पुढे गेल्या आणि आपण आता मागे राहणार या नैराश्येतून तिने हे टोकाचे पाऊल उचलले. या घटनेची अंबड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.