Shikhar Dhawan | भारतीय क्रिकेट संघाचा स्टार प्लेयर तथा अनुभवी सलामीवीर फलंदाज शिखर धवन बऱ्याच दिवसांपासून टीम इंडियात पुनरागमन करू शकला नाही. मात्र, त्याच्या व्यक्तिगत आयुष्यामुळे तो कायमच चर्चेत राहिला आहे. यंदाच्या आयपीएल हंगामात देखील त्याला छाप सोडता आलेली नाही.
2024 च्या आयपीएल हंगामात शिखर धवनला पंजाब किंग्स संघाची कर्णधारपदाची धुरा देण्यात आली होती. मात्र, हंगामाच्या मध्यात दुखापतीमुळे त्याला स्पर्धेतून माघार घ्यायला लागली. सध्या क्रिकेटपासून दूर असलेला शिखर धवन त्याच्या शोमुळे चर्चेत आहे.
शिखर धवन आणि मिताली राजसोबत लग्न करणार?
जिओ सिनेमाच्या ‘धवन करेंगे’ या शोमधील एका मुलाखतीत शिखर धवन याने मोठा खुलासा केलाय. यात तो म्हणाला की, त्याने एकदा एक अफवा ऐकली होती की, तो भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार मिताली राजसोबत (Mithali Raj) लग्न करतोय. शिखरने या चर्चा फक्त अफवा असल्याचं स्पष्ट केलंय.
मिताली राज महिला प्रीमियर लीगमधील गुजरात जायंट्सची मार्गदर्शक असून निवृत्तीनंतर समालोचन आणि मेंटरशिपमध्येदेखील तिने छाप सोडलीये. अशात मिताली आणि शिखरबद्दल काही चर्चा रंगत होत्या. त्यावर शिखरने (Shikhar Dhawan) स्वतः खुलासा केलाय.