SSC Result 2024 | बारावीचा निकाल लागला आहे. आता दहावीच्या निकालाची देखील तारीख जाहीर झाली आहे. बोर्डानं बारावीचा निकाल 21 मे रोजी जाहीर केल्यानंतर राज्यातील विविध शाळांमधील विद्यार्थी आणि पालक दहावीच्या निकालाची वाट पाहत होते. अखेर विद्यार्थ्यांची प्रतिक्षा संपली आहे.
या’ तारखेला लागणार निकाल
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या निकालाची तारिख जाहीर केली आहे. दहावीचा निकाल सोमवारी 27 मे रोजी लागणार आहे. दुपारी 1 वाजता विद्यार्थी आपला निकाल बघू शकतात.
निकाल कोणत्या वेबसाईटरवर पाहणार?
विद्यार्थी mahasscboard.in किंवा mahresult.nic या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन निकाल पाहू शकतात. मात्र निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना नोंदणी क्रमांक, आईचे नाव, रोल नंबर आणि जन्मतारीख आवश्यक असणार आहे. डिजीलॉकरद्वारे देखील निकाल पाहता येऊ शकतो.
राज्यात 2023-24 या शैक्षणिक वर्षात जवळपास 16 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. या विद्यार्थ्यांसह (SSC Result 2024) त्यांच्या पालकांचं लक्ष दहावीच्या निकाल कधी जाहीर होणार याकडे लक्ष लागलं होतं. आता तारीख जाहीर झाल्याने ही चिंता मिटली आहे