Gold-Silver Rate Today | गेल्या काही दिवसांत सोने आणि चांदी या दोन्ही धातूंनी ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळवले. चांदीने या दहा दिवसांत गरुड झेप घेतली होती. तर, सोनं देखील 75 हजारांच्या पार पोहोचलं. मात्र, या चार दिवसांत मौल्यवान धातूत मोठी पडझड झाली.
चार दिवसांत सोने 2700 रुपयांनी स्वस्त झाले. तर, चांदीमध्ये देखील घसरण पाहायला मिळाली. चांदी 6 हजारांनी खाली आलीये. त्यामुळे आज (25 मे) सराफा बाजारात गर्दी दिसून आली. यामुळे खरेदीदारांना मोठा दिलासा मिळालाय.
आठवड्याच्या सुरुवातीला 20 मे रोजी सोनं 500 रुपयांनी (Gold-Silver Rate Today) वधारलं. तर, 21 मे रोजी त्यात 650 रुपयांची घसरण झाली. 24 मे रोजी भाव 980 रुपयांनी खाली आला. आज 25 मे रोजी त्यात पुन्हा घरसण दिसून आली.
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), आता 22 कॅरेट सोने 66,500 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,590 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. चांदीने देखील मोठा दिलासा दिलाय.
घरबसल्या जाणून घ्या भाव
आठवड्याच्या सुरुवातीला चांदीने मोठी मुसंडी (Gold-Silver Rate Today) मारली होती. 20 मे रोजी चांदी 3500 रुपयांनी वधारली. 21 मे रोजी 1900 रुपयांनी चांदी स्वस्त झाली. 22 मे रोजी 1200 रुपयांनी पुन्हा भाव वाढले. मात्र नंतरच्या दोन दिवसांमध्ये 4000 हजारांनी चांदी आपटली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 92,000 रुपये आहे.