“गृहमंत्री महोदय, गाडीखाली कुत्रं नाही तर जीवंत माणसं चिरडली जातायेत”

ainnews
2 Min Read

Rohit Pawar | पुणे जिल्ह्यातून एक मोठी माहिती समोर आली आहे. इंदापूर तालुक्यातील तहसीलदार यांच्यावर भरदिवसा हल्ला करण्यात आला आहे. याचपार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच मागे देवेंद्र फडणवीस यांनी गाडीखाली कुत्र मेलं तरीही विरोधक मंत्रीपदाचा राजीनामा मागतात, असं वक्तव्य केलं होतं. त्यावर आता रोहित पवार (Rohit Pawar) यांनी फडणवीस यांना सुनावलं आहे.

रोहित पवार यांचं ट्विट

देवेंद्र फडणवीस तुम्ही म्हणाला होता की गाडीखालून कुत्र मेलं तरीही विरोधक राजीनामा मागतात. गृहमंत्री महोदय साहेब गाडीखाली कुत्र नाहीतर गाडीखाली माणसं चिरडली जातायेत. रस्त्याने जाणारा माणूस सुरक्षित नाहीत. इंदापूर तहसिलदारावर हल्ला झाला. आता तर अधिकारी सुरक्षित नाहीत. गुन्हेगारांना पोलिसांचा धाक नाही आणि पुण्याच्या पालकमंत्र्यांचा पत्ता नाही. कुठंय तुमचं कायद्याचं राज्य? आपण नेहमी नैतिकतेचे कांदे सोलता थोडी तरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या”, असं रोहित पवार (Rohit Pawar) यांनी म्हटलं आहे. (Rohit Pawar)

इंदापूर येथे तहसिलदार श्रीकांत पाटील यांच्यावर हल्ला करण्यात आला. हल्लेखोर नंबरप्लेट नसलेल्या चारचाकी गाडीमध्ये आले आहेत. तहसिलदार कार्यालयाच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या संविधान चौकामध्ये त्यांच्यावर हा हल्ला झाला आहे.

पाटील यांच्या गाडीचे चालक मखरे यांच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकली. लोखंडी गजाने हल्ला केला. थोडक्यात श्रीकांत हे बचावले त्यांना गंभीर इजा झाली नाही.

देवेंद्र फडणवीस साहेबतुम्ही म्हणाला होतात की, ‘‘गाडीखाली कुत्रं आलं तरी विरोधक राजीनामा मागतील.’’

गृहमंत्री महोदय…. गाडीखाली कुत्रं नाही तर जीवंत माणसं चिरडली जातायेत… रस्त्याने चालणारा सामान्य माणूस सुरक्षित नाही.. भरदिवसा इंदापूर तहसीलदारावर हल्ला झाल्याने अधिकारीही

फेब्रुवारीमध्ये विनोद घोसाळकर यांच्यावर गोळीबार करत हत्या करण्यात आला होता. मॅरिस नामक एका गुंडाने घोसाळकर यांना आपल्या ऑफिसमध्ये बोलावून फेसबुक लाईव्ह सुरू ठेऊन गोळीबार केला होता. यावेळी श्वान गाडीखाली आलं तरीही विरोधक राजीनामा मागतील असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.

काय म्हणाले होते फडणवीस?

या प्रकरणाविरोधात फडणवीस यांना राजीनाम्याची मागणी केली होती. विरोधकांना प्रत्युत्तर देताना फडणवीस म्हणाले होते की, एखाद्या गाडीखाली श्वान आलं तरीही ते राजीनामा मागतील. ही मागणी राजकीय असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणालेले

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *