Manoj Jarange अंतरवाली सराटी । लोकसभा निवडणुक आता अंतिम टप्पात आली आहे. महाराष्ट्रात ४ टप्प्यात मतदान झाले आहे. ५ व्या टप्प्यात मुंबई, नाशिक, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे शहरांचा समावेश आहे.
दरम्यान, अंतरवाली सराटी येथून मनोज जरांगे ४ जून रोजी सकाळी नऊ वाजता उपोषण सुरू करणार आहेत. ८ जून रोजी नारायण गडावर ते सभा देखील घेणार आहेत. ‘सगेसोयरे‘साठी पुन्हा एकदा जरांगे उपोषण आणि आंदोलन करणार आहेत.
मनोज जरांगे यांनी नरेंद्र मोदी वर टीका करत म्हणाले की, ‘नरेंद्र मोदी महाराष्ट्रात इतक्या सभा घेत नव्हते पण यावेळी त्यांना मराठ्यांमुळे जिल्हा जिल्ह्यात सभा घ्याव्या लागल्या. मोदी हे गोधड्या टाकूनच महाराष्ट्रात होते. ही वेळ देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या ४-५ लोकांमुळे आली असल्याचे जरांगे यांनी स्पष्ट केले.
सगेसोयरे आणि ओबीसी मराठा एकच असल्याचा जर अध्यादेश काढला नाही, तर येणारी विधानसभा निवडणूक लढवणार. सरकारने जर मान्य केले तर आम्ही राजकारणात पडणार नाही, तसेच आम्ही भाजप विरोधी नसल्याचे जरांगे म्हणाले.
मनोज जरांगे यांनी पुन्हा उपोषणांचं हत्यार उपसल्याने भाजपला लोकसभेच्या अंतिम टप्प्यात फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.