IPL 2024 । हार्दिक पंड्याचा अतिविश्वास मुंबई इंडियन्सला नडतोय; रोहितचे शतक व्यर्थ, MI चा दारुण पराभव

ainnews
1 Min Read

IPL 2024 ।  माजी कर्णधार रोहित शर्माच्या ६३ चेंडूंत नाबाद १०५ शतकानंतरही मुंबई इंडियन्सला रविवारी इंडियन प्रीमियर लीग  IPL T20 क्रिकेटच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जकडून २० धावांनी पराभव पत्करावा लागला. चेन्नईच्या महेंद्रसिंह धोनीने मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याने टाकलेल्या डावातील अखेरच्या षटकात चार चेंडूंवर तीन षटकारांसह २० धावा फटकावल्या.

चेन्नईने २० षटकांत ४ बाद २०६ अशी मोठी धावसंख्या उभारली. कर्णधार ऋतुराज गायकवाड (४० चेंडूंत ६९) आणि शिवम दुबे (३८ चेंडूंत नाबाद ६६) यांनी चमकदार कामगिरी केली.

मुंबईला २० षटकांत ६ बाद १८६ धावांपर्यंतच मजल मारता आली. रोहितने ६३ चेंडूंत ११ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने नाबाद १०५ धावांची खेळी केली. मात्र, रोहितची ही शतकी खेळी व्यर्थ ठरली. चेन्नईचा वेगवान गोलंदाज मथीश पथिरानाने ४ गडी बाद केले.

चेन्नई सुपर किंग्ज : २० षटकांत ४ बाद २०६, ऋतुराज गायकवाड ६९, शिवम दुबे नाबाद ६६, रचिन रवींद्र २१; हार्दिक पंड्या २/४३

मुंबई इंडियन्स : २० षटकांत ६ बाद १८६, रोहित शर्मा नाबाद १०५, तिलक वर्मा ३१, इशान किशन २३; मथीश पथिराना ४/२८, तुषार देशपांडे १/२९

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *