संजय लीला भन्साळी यांच्या हिरमंडी वेब सीरिजमध्ये फरदीन खान करणार तब्बल १४ वर्षाने कमबॅक

ainnews
2 Min Read

संजय लीला भन्साळी ( Sanjay Leela Bhansali ) ओटीटीच्या (OTT) जगात पदार्पण करणार आहेत. हिरामंडीच्या माध्यमातून अनेक स्टार्स पुनरागमन करणार आहेत. त्यातील एक नाव फरदीन खानचे (Fardeen Khan ) आहे. संजय लीला भन्साळी यांच्या वेब सीरिजमध्ये फरदीन खान वली मोहम्मदची भूमिका साकारणार आहे.

स्वातंत्र्यपूर्व काळातील वेश्याव्यवसाय, सत्ताकारण आणि स्वातंत्र्य चळवळ यावर भाष्य करणाऱ्या या भव्यदिव्य वेबसिरीजची चर्चा सुरुवातीपासूनच प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळतेय. या वेबसिरीजच्या ट्रेलरमध्ये एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या एका अभिनेत्याची झलक पाहायला मिळाली.

अभिनेता फरदीन म्हणाला की, “माझ्यासाठी हे खूप मोठे अंतर होते, जवळपास 14 वर्षे झाली आहेत. या अप्रतिम स्टार कास्टसाठी आणि नेटफ्लिक्स हे व्यासपीठ मिळाले आणि अर्थातच संजय लीला भन्साळी यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. “एक अभिनेता म्हणून पडद्यावर परतण्याची यापेक्षा चांगली संधी मी मागितली नसती.

पुढे तो म्हणाला,”ही एक अशी भूमिका आहे जी या आधी मी कधीच केली नाहीये आणि ही माझ्यासही परफेक्ट भूमिका होती. मी या वयात आता पुन्हा एकदा स्क्रीनवर कमबॅक करतोय या वयात आपण खूप काही अनुभव घेतलेले असतात, आपले काही दृष्टिकोन तयार झाले असता.

तसेच संजयने स्वतः ही सगळी पात्र लिहिली आहेत त्यांच्या पदरांमध्ये आपण आपलं योगदान देऊ शकतो. त्याने लिहिलेली पात्र अतिशय क्लिष्ट आणि गुंतागुंतीची असतात. अशी पात्र तोच लिहू शकतो. त्याच्यासोबत काम करणं अत्यंत कठीण आहे, परंतु त्याचवेळी आपण जेव्हा हे सगळं पाहतो तेव्हा आपल्याला त्याच्यामागचा अर्थ नंतर समजतो.

मी आता खूप भावूक झालोय. मला ही संधी दिल्याबद्दल मी खूप ऋणी आहे.” हे बोलताना त्याला अश्रू अनावर झाले. इन्स्टंट बॉलिवूडने या चॅनल ने फरदीनचा व्हिडीओ त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंट वर शेअर केला आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *