औरंगाबादमध्ये मागच्या ३२ तासांत १८ कोरोना रुग्णांचा मृत्यू

औरंगाबादमध्ये कोरोनाचा प्रादूर्भाव वाढतच असून दगावणाऱ्यांची संख्याही वाढली, शहरात सोमवारी रात्रीपासून आतापर्यंत १८ जणांचा मृत्यू

0

औरंगाबाद : शहरातील सहा महिन्यांच्या बालिकेसह १४ वर्षांच्या मुलाचा उपचारादरम्यान घाटीत मृत्यू झाला. दोघे कोरोनाबाधित होते, असेही स्पष्ट झाले आहे. दरम्यान, २८ मार्चच्या मध्यरात्रीपासून आतापर्यंत घाटीमध्ये १८ बाधितांचा मृत्यू झाल्याचेही सूत्रांनी सांगितले.
ब्रिजवाडी परिसरातील सहा महिन्यांच्या बालिकेला २७ मार्च रोजी घाटीत गंभीर अवस्थेत दाखल करण्यात आले होते आणि तिच्यावर सुपरस्पेशालिटी ब्लॉकमध्ये (एसएसबी) उपचार सुरू होते. उपचारादरम्यान तिचा सोमवारी रात्री नऊ वाजता मृत्यू झाला. तसेच शहरातील ज्युबिली पार्क परिसरातील १४ वर्षीय बालरुग्णाला घाटीमध्ये २३ मार्च रोजी घाटीत दाखल केले होते व त्याच्यावर आयसीसीयुमध्ये उपचार सुरू होते. संबंधित बालरुग्ण हा गंभीर व्याधीग्रस्त होता व उपचारादरम्यान त्याचा सोमवारी रात्री दहा वाजता मृत्यू झाला. त्याचवेळी घाटीमध्ये सोमवारी मध्यरात्री १२ वाजल्यापासून आतापर्यंत १८ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याचेही सूत्रांनी सांगितले.

कोरोना बळींची संख्या १६०८ वर
औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या १६०८ वर गेली आहे. त्याचवेळी जिल्ह्यात १२७२ नवे बाधित आढळून आल्याने कोरोनाबाधितांची एकूण संख्या ८०,०२१ झाली आहे. तर, १२०९ जण कोरोनामुक्त झाल्याने एकूण कोरोनामुक्त व्यक्तींची संख्या ६२,७०७ झाली आहे. सध्या १५,७०६ बाधितांवर उपचार सुरू आहेत.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.