वैजापूर गंगापूर मतदारसंघातील 162 पैकी 124 ग्रामपंचायतींच्या निवडणूक जाहीर

मतदार संघातील सर्व शिवसेना पदाधिकारी यांच्या उपस्थितीत आढावा बैठक

0

औरंगाबाद : वैजापुर गंगापूर मतदारसंघातील 162 ग्रामपंचायत निवडणूका पैकी 124 ग्रामपंचायत निवडणूका जाहीर झाल्या असुन मतदार संघातील सर्व शिवसेना पदाधिकारी यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेतली.

वैजापुर गंगापूर मतदार संघातील 162 ग्रामपंचायत निवडणूका पैकी 124 ग्रामपंचायत निवडणूका जाहीर झाल्या असुन मतदार संघातील सर्व शिवसेना पदाधिकारी यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेतली. या बैठकीत मार्गदर्शन करत गावातील पक्षातील गटबाजी मिटवण्याचा प्रयत्न करा. ग्रामपंचायतीच्या छोट्या छोट्या कार्यकर्त्यांची आपण काळजी घेतली पाहिजे, पँनल करत असतानी सर्वच गोष्टीची चर्चा करून तो पँनल आपण केला पाहिजे, शिवसेना पक्षाची फाटाफूट होणार नाही, यांची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे, 124 ग्रामपंचायत निवडणूकांंपैकी ज्या ग्रामपंचायत निवडणूका बिनविरोध होत असेल तर त्या ग्रामपंचायतींना “प्रोत्साहन पर आमदार निधी” दिला जाणार आहे. तसेच जनते समोर जाताना मागील कामांचा आढावा द्या. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने गावतील पक्षातील मतभेद गटबाजी विसरून ग्रामपंचायत निवडणूकाच्या कामाला लागा, अशा सूचना दिल्या.
सर्कलनिहाय ग्रामपंचायत आढावा घेऊन उपतालुकाप्रमुख, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, पं. स. सदस्य, कृ.ऊ.बा.स.संचालक यांच्या वर जबाबदार्या विभागून दिल्या. या आढावा बैठकीसाठी  उपनगराध्यक्ष साबेरभाई, उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पा जगताप, संतोष जेजुरकर, संतोष काळवणे, तालुका प्रमुख सचिन वाणी, सुभाष पा कानडे, शहर प्रमुख राजेंद्र पा साळुंके, मा जि.प.सदस्य मनाजी पा मिसाळ, मा.सभापती रामहरी बापू जाधव, कृ ऊ.बा.स.उपसभापती विष्णू जेजुरकर, मा.ता. प्रमुख प्रकाश शिंदे, अंकुश पा सुंंब, मा सभापती अंकुश पा हिंगे,उपतालुका प्रमुख गोरख पा आहेर, अनिल पा चव्हाण, डॉ प्रकाश शेळके, पी एस कदम, गोरखनाथ शिंदे,बाळासाहेब पा चव्हाण, मोहन पा साळुंके, प स सदस्य संभाजी पा डांगे, भाऊसाहेब पा गलांडे, राजेंद्र पा वाघ, सतिश बागूल, भानुदास पा पवार, बद्रीभाऊ चव्हाण, कृ.ऊ.बा.स. सदस्य राजेंद्र पा चव्हाण, दिगंबर खंडांगळे, सुरेश अल्हाट, विभाग प्रमुख नानासाहेब थोरात, प्रभाकर जाधव, भिकन सोमासे, प्रकाश मतसागर, सुनिल पोळ, नंदकिशोर जाधव, कल्याण मनाळ, उपविभाग प्रमुख संतोष मामा दौंगे, अंबादास पा खोसे, हरिदास साळुंके,रामनाथ पाटेकर, विजय काकडे,अरूण मगर, चांगदेव जाधव, पांडूरंग जगदाळे, सुरेश पानसरे, मल्हारी पठाड़े, प्रवीण सोनवणे,अशोक हाडोळे, साईराम राऊत,गणेश गायकवाड,संभाजी पा डुकरे शिवसैनिक व शाखा प्रमुख उपस्थित होते.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.