‘गंगामाई साखर कारखान्या’चा १० वा बॉयलर अग्नीप्रदिपन व गळीत हंगाम

या हंगामात कारखान्याचे ११ ते १२ लाख मे .टन गाळपाचे उद्दिष्ट

0
अहमदनगर : गंगामाई इंडस्ट्रीज अँण्ड कंन्स्ट्रक्शन्स् लि. नजिक बाभुळगाव या साखर कारखान्याचा १० वा बॉयलर अग्नी प्रदीपन व गळीत हंगाम शुभारंभ कारखान्याचे चीफ फायनान्सियल अधिकारी  व्ही.एस. खेडेकर व त्यांच्या सुविद्य पत्नी  द्वारका खेडेकर  यांचे हस्ते रविवार ४ सप्टेंबर रोजी बॉयलर व गव्हाणीची विधिवत पूजा करण्यात आली.
 गंगामाई इंडस्ट्रीज अँण्ड कंन्स्ट्रक्शन्स् लि. नजिक बाभुळगाव या साखर कारखान्याचा १० वा बॉयलर अग्नी प्रदीपन व गळीत हंगाम शुभारंभ कारखान्याचे चीफ फायनान्सियल अधिकारी  व्ही.एस. खेडेकर व त्यांच्या सुविद्य पत्नी  द्वारका खेडेकर  यांचे हस्ते रविवार ४ सप्टेंबर रोजी बॉयलर व गव्हाणीची विधिवत पूजा केली. या कार्यक्रमास कारखान्याचे चेअरमन तथा पद्माकर मुळे उद्योग समूहाचे संस्थापक पद्माकरराव मुळे, कार्यकारी संचालक रणजीत मुळे, संचालक समीर मुळे,  संदीप सातपुते, तांत्रिक सल्लागार एस.एन. थिटे, मुख्य व्यवस्थापक  एस. डी. पवार, उत्पादन व्यवस्थापक आर. पी. वाळुंज, मुख्य शेतकी अधिकारी  आर.एस.कचरे,  तसेच कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी व कामगार उपास्थित होते.       या हंगामामध्ये   कारखान्याने ११ ते १२ लाख मे .टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. गाळप हंगाम लवकरच सुरू करण्याची पूर्वतयारी झाली आहे. यावर्षी परिसरामध्ये मुबलक प्रमाणात पाऊस झालेला असल्याने उसाचे लागवड क्षेत्रात व उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे कारखान्याकडे नोंदणी झालेल्या संपूर्ण उसाचे गाळप करण्याचे मोठे आव्हान आहे. त्यामुळे कारखान्याने साखर उत्पादन कमी प्रमाणात घेऊन इथेनॉलचे उत्पादन वाढविण्याचे ठरविलेले आहे. कारखान्याकडे नोदंणी केलेला ऊसतोडणी  नियोजनाप्रमाणे गाळपास घेण्यात येईल, नोंदणी झालेला संपूर्ण ऊस गाळपास आणण्याचा कारखान्याकडून पुरेपूर प्रयत्न केला जाईल. तरी कोणीही तोडणी नियोजना व्यतिरिक्त ऊस तोडीसाठी आग्रह करू  नये, जेणेकरून तोडणी नियोजनाप्रमाणे ऊसतोड करता येईल. तरी सर्व ऊस उत्पादकांनी कारखाना व्यवस्थापनास सहकार्य करावे, असे आवाहन कारखान्याचे चेअरमन पद्माकरराव मुळे यांनी केले. कारखान्याचे कार्यकारी संचालक  रणजीत मुळे यांनी सध्या देशात व राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्यामुळे कारखाना व्यवस्थापनाने परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी व सभासद यांना कार्यक्रमासाठी निमंत्रित केलेले नाही, यामुळे कोणीही गैरसमज करून घेऊ नये, असे आवाहन केले. तसेच परिसरामध्ये पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असल्याने ऊस उत्पादकांनी को-२६५ ऐवजी लवकर परिपक्व होणाऱ्या, जादा ऊस उत्पादन व साखर उतारा देणाऱ्या सुधारित जातीच्या ऊसाची जास्तीत जास्त लागवड करावी. सुधारीत जातीचे ऊस बेणे उपलब्धता व ऊस लागवडी विषयीचे मार्गदर्शन घेण्यासाठी कारखान्याचे मुख्य ऊस विकास अधिकारी विठठ्लराव शिंदे व कारखान्याच्या गट ऑफीसला संपर्क करावा, असे आवाहन केले.
Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.