महाराष्ट्रातील १० सर्वोत्तम पर्यटन स्थळे: मन प्रसन्न करणारा निसर्ग आणि विलोभनीय इतिहास!

ainnews
5 Min Read

महाराष्ट्र हे भारतातील एक महत्त्वाचे आणि प्रगत राज्य म्हणून ओळखले जाते. दरवर्षी हजारो लोक इथे फिरायला येतात. महाराष्ट्राला ७२० किलोमीटर लांबीचा मोठा समुद्रकिनारा लाभलेला आहे. त्यामुळे परदेशी पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्रामध्ये धार्मिक, ऐतिहासिक आणि नैसर्गिक अशी खूप पर्यटन स्थळे आहेत, जी पाहिल्यावर मनाला खूप आनंद मिळतो.

मी तुम्हाला अशा काही खास पर्यटन स्थळांबद्दल माहिती देत आहे:

१. महाबळेश्वर

महाबळेश्वर हे थंड हवेचे आणि निसर्गरम्य ठिकाण मानले जाते. हे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात आहे. महाबळेश्वरची खासियत म्हणजे तिथे पाच नद्यांचा उगम झाला आहे. दर महिन्याला लाखो पर्यटक तिथल्या निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी येतात. इथे स्ट्रॉबेरीच्या अनेक बागा पाहायला मिळतात आणि त्याचा आस्वादही घेता येतो. महाबळेश्वरला अनेक पॉईंट्स आणि प्राचीन मंदिरे आहेत, ज्यामुळे या ठिकाणाला ‘महाबळेश्वर’ हे नाव मिळाले.

२. मुरुड जंजिरा

मुरुड जंजिरा हे एक खूप लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. हा किल्ला रायगड जिल्ह्यात आहे. रोज हजारो पर्यटक या किल्ल्याची माहिती घेण्यासाठी येतात. या किल्ल्याची खास गोष्ट म्हणजे हा किल्ला समुद्राच्या अगदी मधोमध बांधला गेला होता, आणि तो शिवकालीन काळाच्याही अगोदर बांधण्यात आला होता. या किल्ल्याला अजूनही कोणी जिंकू शकले नाही, ही त्याची मोठी खासियत आहे. सिद्धी जोहर यांनी हा किल्ला बांधला होता. हा किल्ला शत्रूंपासून आपली सुरक्षा करण्यासाठी बनवला गेला होता. या किल्ल्यावर जाण्यासाठी बोटीतून जावे लागते.

३. कोल्हापूरचा कनेरी मठ

जर तुम्ही कोल्हापूरच्या कनेरी मठात गेला नसाल, तर तुम्ही आतापर्यंत काही खास आकर्षण पाहिले नसावे. इथे अनेक प्राचीन संस्कृतीची चित्रे, कलाकृती आणि पुतळे दाखवले आहेत. ही संस्कृती आजकाल नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. इथे भारतातील अनेक संत-साधूंचे पुतळे, तसेच महाभारत आणि रामायण दर्शवणारे पुतळे उभारले आहेत. हे पुतळे अगदी खरे माणसे असल्यासारखे वाटतात. यामुळे हे ठिकाण खूप आकर्षक आणि अनुभव घेण्यासारखे आहे.

४. पुण्याचा शनिवार वाडा

पुण्याचा शनिवार वाडा हे पर्यटकांचे सर्वात प्रसिद्ध ठिकाण आहे. हा वाडा पेशवेकालीन काळात बांधला गेला होता. हा वाडा पेशवे बाजीराव यांनी बांधला होता. हा वाडा आतून खूप मोठा आणि भव्य आहे, तसेच तो खूप रहस्यमयही मानला जातो. काही लोकांचा असा विश्वास आहे की अमावस्येच्या रात्री या वाड्यातून आवाज येतात.

५. माथेरान

माथेरान हेसुद्धा थंड हवेचे ठिकाण आहे. हे रायगड जिल्ह्यात वसलेले आहे. माथेरान हे निसर्गाच्या सौंदर्याने नटलेले सुंदर पर्यटन स्थळ आहे. सह्याद्री पर्वतरांगामुळे हे ठिकाण खूप थंड आणि आकर्षक वाटते. इथे अनेक पॉईंट्स आहेत, जिथे लोक निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी येतात. इथे तरुण प्रेमी मोठ्या प्रमाणात येतात आणि काही पर्यटक घोड्याची सवारी सुद्धा करतात.

६. लोणावळा

लोणावळा हे महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यात आहे. हेसुद्धा थंड हवेचे ठिकाण आहे. पावसाळ्यात लोणावळा पूर्णपणे निसर्ग सौंदर्याने नटलेले असते. हिवाळ्यात इथे खूप धुके (फॉग) असते, ज्यामुळे हे ठिकाण अधिक सुंदर वाटते. लोणावळ्यात अनेक फिरण्याची ठिकाणे आहेत, जसे की अनेक पॉईंट्स, धरणे, अतिप्राचीन किल्ले आणि लेणी (गुंफा) सुद्धा आहेत. लोणावळ्याचा सुप्रसिद्ध पदार्थ म्हणजे चक्की (चिक्की) जो चवीला खूप स्वादिष्ट असतो.

७. छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक आकर्षक पर्यटन स्थळे आहेत, जसे की बीबी का मकबरा, पानचक्की, चांद मिनार, दिल्ली गेट, दौलताबाद किल्ला, आणि शिवाजी महाराज म्युझियम. या ठिकाणी भेट दिल्यावर खूप आनंद मिळतो.

८. अलिबाग

अलिबाग हे रायगड जिल्ह्यातील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. येथील स्वच्छ आणि सुंदर समुद्रकिनारे पर्यटकांना खूप आकर्षित करतात. इथे देश-विदेशातून अनेक पर्यटक येत असतात. पूर्वी इथे ‘अली’ नावाचा एक माणूस होता, ज्याच्याकडे अनेक सुंदर बागा होत्या, त्यामुळे या शहराचे नाव अलिबाग ठेवण्यात आले. अलिबागमध्ये मांडवा, मुरुड बीच, वरसोली बीच, नागाव बीच यांसारख्या अनेक ठिकाणांना पर्यटक भेट देतात.

९. कास पठार

कास पठार हे सुंदर आणि आकर्षक ठिकाण महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यामध्ये आहे. साताऱ्यापासून हे ठिकाण सुमारे २२ किलोमीटर दूर आहे. जर तुम्हाला निसर्गाचे रंगबिरंगी सौंदर्य आणि वेगवेगळ्या फुलांचा आनंद घ्यायचा असेल, तर कास पठाराला नक्की भेट द्या. निसर्गाची आवड असलेले पर्यटक इथे मोठ्या संख्येने येतात. या पठारावर जवळच सात तलाव देखील पाहायला मिळतात.

१०. गणपतीपुळे

गणपतीपुळे हे महाराष्ट्रातील सर्वात सुंदर ठिकाणापैकी एक आहे. हे ठिकाण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. समुद्रकिनाऱ्यावर असलेले गणपतीचे मंदिर हे येथील मुख्य आकर्षण आहे. हे गणपती मंदिर जवळपास ५०० वर्ष जुने आहे. विशेष म्हणजे, पावसाळ्यात समुद्राच्या लाटा थेट या मंदिरात येतात. अनेक भाविक दर्शनासाठी आणि सोबतच सुंदर समुद्रकिनारा पाहण्याचा आनंद घेण्यासाठी इथे येतात

Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *