​‘हिंदी मीडियम’ फेम सबा कमरने पाकिस्तानी असण्याची मांडली व्यथा, अश्रू झाले अनावर

0

‘हिंदी मीडियम’ या चित्रपटात इरफान खानसोबत झळकलेली पाकिस्तानी अभिनेत्री सबा कमरचा नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पाकिस्तानी असल्यामुळे सहन कराव्या लागलेल्या त्रासाबद्दल सबाने या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले आहे.

आंतरराष्ट्रीय विमानतळांवर सुरक्षा अधिकाऱ्यांच्या संशयास्पद नजरांमुळे अपमानकारक वाटल्याचे सबाने एका टीव्ही शोमध्ये उघड केले. आपण पाकिस्तानी अभिनेत्री असल्यामुळे चेकिंग करताना हा जाच सहन करावा लागतो, असा दावा तिने केला. हा अनुभव सांगताना सबाला अश्रू अनावर झाले होते.

युरेशियन जॉर्जियाची राजधानी तबलिसीला गेले तेव्हाचा हा प्रकार सबाने 49 सेकंदांच्या या व्हिडिओत सांगितला आहे. ‘आम्ही एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी तबलिसीला गेलो होतो. सर्व भारतीय क्रूला पुढे पाठवण्यात आले, मात्र मला तिथेच अडवले. याचे कारण माझा पासपोर्ट. कारण मी पाकिस्तानहून आले होते. त्यांनी पूर्ण तपास केला. माझी संपूर्ण चौकशी केल्यानंतर मग अनेक तासानंतर माझी सुटका झाली. मग त्यांनी मला पुढे जाऊ दिले’ असे सबाने सांगितले. ‘त्या दिवशी मला आमची खरी जागा समजली. जगात आमचे काय स्थान आहे?’ असा प्रश्न सबा कमरने यावेळी उपस्थित केला.

सबाचा हा व्हिडिओ सबा आलम नामक अकाऊंटवरून अपलोड करण्यात आला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होतो आहे.

पाकिस्तानी चित्रपट आणि टेलिव्हिजन विश्वात सबा कमर खूप प्रसिद्ध आहे. ‘उडान’, ‘बागी’ ‘जिनाह के नाम’ आणि ‘आईना’ यासारख्या चित्रपट आणि मालिकांमध्ये तिने काम केले आहे. सबाने ‘हिंदी मीडियम’ या चित्रपटातसुद्धा काम केले आहे.

 

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.