२०१९ मध्ये पुन्हा एनडीएचे सरकार येईल – देवेंद्र फडणवीस

0

हा विजय म्हणजे फक्त ट्रेलर आहे. मोदींनी दिलेला विकास, विश्वास, अमित शहांचे संघटन यामुळे भाजपला त्रिपुरा, नागालँडमध्ये विजय मिळला, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. भाजपच्या विजयानंतर त्यांनी पत्रकारांशी याविषयी संवाद साधला.

मुख्यमंत्री म्हणाले, ‘गुजरात, हिमाचल, त्रिपुरा या तीनही राज्यात नागरिकांनी ४९ ते ५० टक्के मतदान केले आहे. आदिवासी समाजाने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला आहे. मोदी यांच्या नेतृत्वावर अविश्वास निर्माण करणाऱ्यांना हा विजय एक उत्तर आहे. मोदी यांच्यावर भारताचा विश्वास आहे. भाजपच कर्नाटक निवडणूक जिंकेल आणि २०१९ मध्ये पुन्हा एनडीएचे सरकार येईल, असा आम्हाला विश्वास आहे. एवढे मोठे यश कधीच कुणाला मिळाले नसेल.

त्रिपुरा, नागालँड विधानसभा निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक विजय मिळवल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान, भाजपाध्यक्ष यांच्यासह पूर्वोत्तरच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. देशात ‘डावे’ केवळ नावालाच उरले आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला. तसेच, काँग्रेसने केवळ पोटनिवडणुकाच लढवाव्यात कारण इतर निवडणुकीत ते विजयी होऊ शकत नाहीत, अशा शब्दात देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेसलादेखील टोला लगावला.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.