ह्रदयविकाराच्या झटक्याने दहावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

0

मुंबई येथील प्रभादेवी परिसरातील एका दहावीच्या विद्यार्थ्याचा ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मृत मुलाचे नाव ऋतिक दिलीप घडशी असे आहे. ऋतिक दादरच्या शिशूविहार शाळेत शिकत होता. आज दहावीचा पहिला पेपर देण्यापूर्वीच रात्री दीड वाजेच्या सुमारास झोपेतच त्याला हृदयविकाराचा झटका आला. रूग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

ऋतिक आपल्या आई आणि २ बहिणींसह राहत होता. ऋतिक लहान असतानाच त्याच्या वडिलांचे निधन झाले. आई धुणीभांडी करून घर सांभाळते आणि ऋतिकचे शिक्षण करत होती. केईएम रूग्णालयात पोस्टमार्टेम करून ऋतिकचा मृतदेह कुटुंबियांकडे सोपवला आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.