हॉलिवूड अभिनेत्री मेरील स्ट्रीप यांना 21 वे ऑस्करचे नामांकन, स्वतःचाच विक्रम काढला मोडीत
जगप्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री मेरील स्ट्रीप यांनी स्वतःचाच विक्रम मोडीत काढून नवीन विक्रम रचला आहे. ‘द पोस्ट’ या चित्रपटासाठी त्यांना ऑस्करचे नामांकन मिळाले. हे त्यांचे 21 वे नामांकन असून 21 पैकी 3 वेळा त्यांना ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. इतकेच नव्हे तर गोल्डन ग्लोब अवॉर्ड्ससाठी त्यांना 31 वेळा नामांकन मिळाले आहे. त्यापैकी 8 वेळा त्यांना हा पुरस्कार मिळाला. ‘द पोस्ट’ या चित्रपटात वॉशिंग्टन पोस्टच्या माजी प्रकाशक कॅथरीन ग्रहॅम यांची भूमिका स्ट्रीप यांनी साकारली आहे. मेरीलसोबत सॅली हॉकिन्स (द शेप ऑफ वॉटर), फ्रान्सेस मॅकडॉर्मंड (थ्री बिलीबोर्ड्स आऊटसाईड एबिंग, मिसौरी), मार्गोट रॉबी (आय, टॉन्या), साओर्स रोनान (लेडी बर्ड) या अभिनेत्री या स्पर्धेत आहेत.
20 वेळा मिळाले नामांकन –
यापूर्वी मिळालेल्या 20 नामांकनांपैकी तीन पुरस्कार मेरिल यांना मिळाले आहेत. यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे दोन, तर सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या एका ऑस्कर पुरस्कारचा समावेश आहे. 1979 मध्ये मेरील यांना पहिल्यांदा ऑस्कर नामांकन मिळाले होते. 1980 मधील क्रॅमर व्हर्सेस क्रॅमर या चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा ऑस्कर त्यांना मिळाला. त्यानंतर 1983 मध्ये सोफीज् चॉईस या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्तम अभिनेत्रीचा ऑस्कर मिळाला. 1983 नंतर तब्बल 19 वर्ष त्यांना ऑस्करने हुलकावणी दिली. 2012 मध्ये 17 वे नामांकन मिळवत त्यांनी ‘द आयर्न लेडी’ या चित्रपटासाठी त्यांनी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑस्कर पुरस्कार पटकावला. गेल्या वर्षी ‘फ्लॉरेन्स फॉस्टर जेनकिन्स’ या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे ऑस्कर नामांकन मिळाले होते.
4 मार्चला हा ऑस्कर सोहळा हॉलिवूड अँड हायलँड सेंटर येथील डॉल्बी थिएटरमध्ये रंगणार आहे. जिम्मी किम्मेलच यावेळी सूत्रसंचालन करेल.
ऑस्कर नामांकन –
सर्वोत्कृष्ट चित्रपट –
कॉल मी बाय युअर नेम
डार्केस्ट आवर
डंकर्क
गेट आऊट
लेडी बर्ड
फँटम थ्रेड
द पोस्ट
द शेप ऑफ वॉटर
थ्री बिलबोर्ड आऊटसाईड एबिंग, मिझूरी
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन –
ख्रिस्तोफर नोलान (डंक्रिक)
जॉर्डन पीले (गेट आऊट)
ग्रेटा गेरविग (लेडी बर्ड)
पॉल थॉमस अँडरसन (फँटम थ्रेड)
गिलर्मो डेल टोरो (द शेप ऑफ वॉटर)