हुक्का पार्लरवर कायदा लवकरच, मुख्यमंत्र्यांची विधानपरिषदेत घोषणा

0

हुक्का पार्लरच्या माध्यमातून तरुणाई नशेच्या अधीन जात आहे. याला निर्बंध घालण्यासाठी लवकरात लवकर कठोर कायदा आणणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केली. मुख्यमंत्र्यांनी याबाबत विधानपरिषदेत सांगितले. कमला मिल आग प्रकणाबाबत लक्षवेधीसूचनेवर बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

कमला मिल आग प्रकरणानंतर हुक्का पार्लरवर बंदी का नाही असा प्रश्न विरोधी पक्षाच्या आमदारांनी विधानपरिषदेत उपस्थित केला होता. त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देताना कमला मिल आग प्रकरणाच्या चौकशीसाठी निवृत्त न्यायाधीशांची समितीदेखील नेमली जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

 

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.