हिवाळ्यात त्वचेची घ्या अशी काळजी
हिवाळ्यात संपूर्ण दिवस स्वेटर घातले तरीदेखील त्वचा रुक्ष आली काळी पडते. तसेच हिवाळा असला तरीसुद्धा कडक ऊन पडते. या ऊन्हामुळे गर्मी होते. तसेच ऊन्हात असलेल्या अल्ट्रावॉयलेट किरणांमुळे त्वचेचे नुकसान होते. यामुळे सनबर्न तसेच टॅनिंगच्या समस्या वाढतात. या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी आम्ही तुम्हाला आज काही उपाय सांगणार आहोत.
रुक्ष त्वचेसाठी-
हिवाळ्यात आपण पाणी कमी पितो. त्यामुळे अनेक समस्या उद्भवतात. परंतु त्वचा तजेलदार ठेवण्यासठी हिवाळ्यात सुद्धा जास्त पाणी प्यावे. तसेच दही आणि मधापासून बनलेले फेसपॅक त्वचेसाठी वापरावे.
तेलकट त्वचेसाठी-
चेहऱ्याचा तेलकटपणा दूर करण्यासाठी दिवसातून दोन-तीनवेळा कोमात पाण्याने चेहरा धुवा. गुलाबजलमध्ये लिंबूचा रस टाकून चेहऱ्याला लावा. यामुळे तेलकट चेहरा काळा पडत नाही.
मिश्रित त्वचेसाठी-
जर तुमची मिश्रित त्वचा असेल तर गालावर चांगल्याप्रकारे मॉइस्चरायझिंग करावे. कारण ही त्वचा रुक्ष होत असते. हनुवटी आणि चेहऱ्याच्या इतर भागावर स्क्रबचा वापर करावा.
नॉर्मल त्वचेसाठी-
नॉर्मल त्वचा असणाऱ्यांनी बाहेर पडण्यापूर्वी सनस्क्रीन लावावे. तसेच तुम्ही तुमची त्वचा कोणत्या प्रकारातील आहे हे ओळखून योग्य उपाय करावा. खूप पाणी प्यावे आणि हेल्दी डाएट घ्यावे.