हिवाळ्यात जास्त गरम पाण्याने अंघोळ केल्यास होतील हे परिणाम

0

हिवाळ्यात लोक जास्त गरम पाण्याने अंघोळ करतात. कोमात पाणी शरीराला चांगले असते, त्यामुळे थकवादेखील
दूर होतो. परंतु पाणी खूप गरम म्हणजे अगदी कडक असेल तर ते शरीरासाठी हानिकारक आहे. जास्त ठंड  पाणी जसे शरीरासाठी हानिकारक असते तितकेच जास्त गरम पाणीसुद्धा हानिकारक आहे. त्यामुळे आंघोळीचे पाणी नेहमी शरीराच्या तपमानाच्या बरोबरीने असावे. जास्त गरम पाण्याने त्वचा आणि केसांना नुकसान पोहोचते. जास्त गरम पाण्याने त्वचा जळते तसेच त्वचेचा रंग काळा पडतो. अनेकदा त्वचा रुक्ष होते. त्यामुळे खाज येते. यामुळे डोळ्यांचा ड्रायनेस वाढू शकतो. डोळे लाल होऊन खाज येऊ शकते.

त्वचा जळू शकते –

पाण्याचा सर्वप्रथम त्वचेशी संपर्क येतो. त्यामुळे पाणी ३२ डिग्री सेल्सीयसपेक्षा जास्त गरम असेल तर तुमची त्वचा जळू शकते. शरीरातील काही अंगाची त्वचा संवेदनशील होऊ शकते, जसे- चेहरा, डोळे, पाठ. अशा नाजूक अंगावर गरम पाणी हानिकारक आहे.

वाढू शकतात सुरकुत्या –
जास्त गरम पाण्याने अंघोळ केल्यास सुरकुत्या वाढण्याची दाट शक्यता असते. जास्त गरम पाणी त्वचेच्या आतील मुलायमपणा कमी होतो. शरीर जोपर्यंत तरुण आहे तोपर्यंत हा परिणाम दिसत नाही. परंतु थोडे वय वाढताच सुरकुत्या दिसू लागतात.

केस गळू शकतात –
जास्त गरम पाणी त्वचाच नव्हे तर केसांसाठीसुद्धा हानिकारक आहे. गरम पाण्याने केस कमजोर होऊन तुटू लागतात. जास्त गरम पाण्याने केस धुतल्यास कोंडा होऊ शकतो. यामुळे केसांची वाढ कमी होते.

चक्कर येऊ शकतात –
जास्त गरम पाण्याने अंघोळ केल्यास शरीराराला आतून नुकसान होते. यामुळे तुम्हाला चक्कर येण्याची समस्यासुद्धा होऊ शकते. कारण जास्त गरम पाणी डोक्यांच्या नसांना नुकसान करू शकते.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.