‘हिंमत असेल तर कोकणातील प्रकल्प रद्द करुन दाखवा’, नारायण राणेंनी घेतला शिवसेनेचा समाचार

0

‘रत्नागिरीत प्रकल्पाला विरोध असल्याचे सांगायचे आणि दुसरीकडे गुपित जमिनींचे व्यवहार करायचे ही शिवसेनेची नीती आहे. हिंमत असेल तर उद्धव ठाकरेंनी कोकणातील प्रकल्प रद्द करुन दाखवावा.’ असे आव्हानही महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी शिवसेनेला दिले आहे.

राजापूर तालुक्यातील नाणार परिसरात पेट्रोकेमिक प्रकल्पाला विरोध दर्शवण्यासाठी नारायण राणे यांनी सागवे कात्रादेवी एक सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.

विशेष म्हणजे या सभेत नारायण राणे यांनी शिवसेनेला चांगलेच चिमटे काढले. शिवसेनेने पंधरा दिवसांत प्रकल्प रद्द करण्याची भाषा केली होती, त्याचे पुढे काय झाले असा प्रश्नही राणे यांनी विचारला. जोपर्यंत नाणारच्या जनतेला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी त्यांच्यासोबत आहे. तुम्ही तुमची एकजूट अशीच दाखवा, प्रकल्पाला आमचा पूर्ण विरोधच राहणार आहे, असेही यावेळी नारायण राणे यांनी सांगितले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.