स्वातंत्र्यसैनिक, लेखक, सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. दिनकर बोरीकर यांचे निधन

0

मराठवाडा मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक, लेखक, ज्येष्ठ विचारवंत, सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. दिनकर बोरीकर (वय ८३) यांचे मंगळवारी (१६ जानेवारी) सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. प्रा. बोरीकर हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. मंगळवारी त्यांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले होते. सायंकाळी सात वाजेच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. आज (१७ जानेवारी) सकाळी ९.३० ते १०.३० या वेळेत त्यांचे पार्थिव सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर ११ वाजता पुष्पनगरी स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

त्यांच्या निधनामुळे बुधवारी औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातील स.भु. संस्थेच्या सर्व शाळा व महाविद्यालये बंद राहतील, असे संस्थेचे सरचिटणीस दिनेश वकील यांनी कळवले आहे. प्रा. बोरीकर यांच्या पश्चात पत्नी सुहासिनी, तसेच डॉ. रश्मी बोरीकर, रोहिणी देसाई व डॉ. रेणू चव्हाण या तीन मुली असा परिवार आहे.

स्वामी रामानंद तीर्थ यांच्या आदेशानुसार तेलंगणा आणि हैदराबाद येथे खादी कार्य, भाषावार प्रांतरचनेनंतर बोरीकर औरंगाबादेत आले आणि मराठवाड्यातील सर्वात जुन्या सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या सेवेत रुजू झाले. अर्थशास्त्र विभागाचे प्राध्यापक म्हणून सेवानिवृत्त झाल्यानंतर ते १९९८ ते २००८ या कालावधीत संस्थेच्या सरचिटणीसपदी कार्यरत होते. त्यानंतर संस्थेचे उपाध्यक्ष व नोव्हेंबर २०११ पासून आजवर संस्थेच्या अध्यक्षपदी कार्यरत होते.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.