स्मिथ आणि वॉर्नरवर एक वर्षाची बंदी, क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा निर्णय

0

अनाधिकृतपणे चेंडू कुरतडल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियन खेळाडू स्टिव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरवर एका वर्षांची बंदी घातली आहे.

तसेच क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्पष्ट केले, की स्टिव्ह स्मिथ संघात परत आल्यानंतरदेखील एक वर्ष त्याला कर्णधार पद दिले जाणार नाही. तसेच डेव्हिड वॉर्नरवर याही पेक्षा जास्त कडक कारवाई केली आहे. कारण वॉर्नर कधीच कर्णधार होऊ शकणार नाहीये.

मिडिया रिपोर्टनुसार, दोघांना या शिक्षेविरोधात दोघांना एका आठवड्यात अपील करण्याची मुदत देण्यात आली आहे. या आरोपात समील असलेल्या ऑस्ट्रेलियाचा ओपनर कॅमरान बॅनक्राफ्टवरही बंदी घालण्यात आली आहे. स्मिथ आणि वॉर्नरवर एक वर्षांची बंदी घातल्यानंतर बीसीसीआयने दोघांना आयपीएल 2018मधून बाहेर केले आहे.

वॉर्नरने मागितली चाहत्यांची माफी –

‘ऑस्ट्रेलिया आणि जगभरातील चाहत्यांनो मी सिडनीला परत येत आहे. माझ्याकडून चुकी झाली. त्यामुळे क्रिकेटला नुकसान झेलावे लागले. मला माझी चुक मान्य आणि मी त्याची जबाबदारी घेतो. माझ्या या चुकीचा क्रिकेट चाहत्यांना त्रास झाला. याची मला जाणीव आहे. मी बालपणापासून प्रेम करत असलेल्या खेळावर माझ्याकडून काळा डाग लागला आहे.’ असे डेव्हिड वॉर्नरने म्हटले आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.