सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारी प्रिया वारियर बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण

0

आपल्या नजरेच्या हावभावाने सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारी नवोदित अभिनेत्री प्रिया वारियर लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. प्रिया तिचा आवडता अभिनेता रणवीर सिंगसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.

प्रिया रणवीर सिंगच्या आगामी ‘सिंबा’ चित्रपटात झळकणार असल्याचा खुलासा निर्माता करण जोहरने एका मुलाखतीत केला आहे. कारण म्हणाला की, ‘प्रिया फक्त तिच्या डोळ्यांच्या हावभावामुळे स्टार झाली आहे. तिने सर्वांनाच भूरळ पाडली आहे. अनेक अभिनेत्रींना मागे टाकले आहे, त्यामुळे तिच्या अभिनयाची बॉलिवूडलाही उत्सुकता आहे.’

प्रियाने अनेक मुलाखतींमध्ये ‘मला रणवीर सिंगसोबत काम करण्याची इच्छा आहे’ असे सांगितले आहे. हा योग जुळून आला तर प्रियाला रोहित शेट्टी आणि रणवीर सिंगसारख्या कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळणार आहे. तसे पाहता, प्रियाच्या अभिनयामुळे आणि यशामुळे बॉलिवूडमधून तिला अनेक ऑफर्स आल्या. परंतु तिने सध्या सर्वांना नकार दिला. कारण तिला तिच्या मल्याळम चित्रपटाकडे लक्ष केंद्रित करायचे आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.