सोनम कपूर अडकणार लग्नगाठीत, वाचा कोण आहे तिचा होणारा पती?

0

अभिनेत्री सोनम कपूरने चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. तिने लग्नगाठीत अडकण्याचा निर्णय घेतला आहे. ती बॉयफ्रेंड आनंद आहूजासोबत साताजन्माच्या गाठी बांधणार आहे. एका चित्रपटाचे शूटिंग संपताच म्हणजे 11 किंवा 12 मे रोजी ती लग्न करणार आहे. दोघे दिर्घकाळापासून एकमेकांना डेट करत आहेत.

सोनम आणि आनंद राजस्थानमध्ये लग्न करणार असल्याचे बोलले जात होते. मात्र एका रिपोर्टनुसार दोघे जगातील सर्वात महागड्या शहरात म्हणजे स्वित्झर्लंडच्या जेनेवामध्ये लग्न करणार आहेत. कपूर कुटुंबियांनी लग्नाची तयारदेखील सुरु केली आहे. लग्नाचा वेन्यूसुद्धा बुक करण्यात आला आहे.

तसेच अनिल कपूर स्वत: फोन करून सर्वांना लग्नाचे आमंत्रण देत आहेत. हिंदू पद्धतीने लग्न होणार असून संगीत आणि मेंदीचे विधीदेखील होणार आहेत. लग्नापूर्वी सारखरपुडा होणार आहे. इतकेच नव्हे तर लग्नाच्या ड्रेससाठी सोनमने डिझाइनर अबु जानी आणि संदीप खोसला यांना सिलेक्ट केले आहे. तसेच Ralph & Russo हे सोनमच्या इतर विधींचे ड्रेस डिझाइन करणार आहेत. सध्या सोनम ऑस्ट्रियामध्ये आहे.

सोनमचा होणारा पती आनंद आहूजा दिल्लीमध्ये बिझनेसमन आहे. आनंद Bhane या फॅशन ब्रँडचा मालक आहे. त्याने यूएसच्या व्हार्टन बिझनेस स्कूलमधून शिक्षण घेतले आहे. Bhane हा सोनमच्या आवडत्या फॅशन ब्रँडपैकी एक आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.