सुहाना खानचा हा बिकिनीमधील फोटो होतोय व्हायरल

0

बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खानची मुलगी सुहानाच एक बिकिनीमधील फोटो सध्या व्हायरल होत आहे. सुहाना लोकप्रिय स्टार किड्सपैकी एक आहे.

ती कोणत्याही चित्रपटात झळकली नसली तरी एखाद्या स्टारपेक्षा कमी नाहीये. तिच्या प्रत्येक फोटोची नेहमीच चर्चा होत असते. नुकताच तिचा एक बिकिनीमधील फोटो बराच व्हायरल झाला आहे.

सुहाना खान तिच्या मैत्रीणीसोबत स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करताना दिसत आहे. तिचा हा अंदाज भूरळ घालणारा आहे.

यापूर्वी सुहाना अनेकदा स्विमिंग सुटमध्ये दिसली आहे. आई गौरी नेहमीच सुहानाचे फोटो सोशल मिडियावर शेअर करत असते.

सुहानामध्ये पूर्वीपेक्षा आता बराच बदल झालेला दिसतो. तिच्या बदलावमध्ये तिची आई गौरीचा मोठा वाटा आहे.

काही दिवसांपूर्वी तिने आपल्या आजीसोबतचा एक फोटो शेअर केला होता. त्या फोटोमुळे ती सोशल मिडियावर ट्रोल झाली होती. अनेकांनी तिला म्हटले होते, की तुझ्यापेक्षा तुझी आजी छान दिसते.

शाहरुखने एका मुलाखतीत सांगितले होते, की सुहानाला अभिनेत्री व्हायचे आहे. तिचे सध्या शिक्षण सुरु आहे. त्यानंतर ती थिएटर जॉइन करणार असून अभिनयाचे धडे गिरवणार आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.