सुहानाचा हा अंदाज करतोय आकर्षक, फोटो झाले व्हायरल
सुपरस्टार शाहरूख खानची मुलगी सुहाना खान तिच्या सौंदर्यामुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. अलीकडेच सुहानाचे काही नवीन फोटो सोशल मिडियावर समोर आले आहेत. सुहाना या फोटोमध्ये ट्रॅडिशनल लूकमध्ये अगदी सुंदर आणि मादक दिसत आहे.
वडील शाहरुख आणि आई गौरीसोबत सुहाना एका लग्नसोहळ्यात सामील झाली होती. यावेळी तिने सुंदरसा फ्लोरल लेहंगा परिधान केला होता. सोहेल खानची पत्नी सीमा खानने हा लेहंगा डिझाइन केला आहे.
सीमाने आपल्या इंस्टाग्रामवरून एक पोस्ट केली, कि ‘या सफेद लेहंग्यामध्ये सुहाना खूपच सुंदर दिसत आहे, आकर्षक फ्लोवर ज्वेलरी तिच्या लुकला पूर्ण करत आहे.’ सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या फोटोमध्ये शाहरूख आणि गौरीदेखील दिसून आले.
शाहरूखने यापूर्वी सांगितले होते, कि सुहानाला अभिनेत्री व्हायचे आहे. चित्रपटाबद्दल तिला अभिरुची आहे.