सुप्रीम कोर्टाचा कारभार व्यथित करणारा, पहिल्यांदाच न्यायाधीशांची पत्रकार परिषद

0

देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टाच्या चार न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेतली. न्यायमूर्ती जे चेलमेश्वर यांच्या घरी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. न्यायमूर्ती कुरियन जोसेफ, न्यायमूर्ती रंजन गोगोई, न्यायमूर्ती जे चेलमेश्वर आणि न्यायमूर्ती मदन लोकूर यांनी पत्रकार परिषद घेतली.

“सुप्रीम कोर्टाचे प्रशासन गेल्या दोन महिन्यांपासून योग्यरीत्या काम करत नाहीये. सुप्रीम कोर्टाचा कारभार व्यथित करणारा आहे. याबाबत मुख्य न्यायमूर्तींसमोर प्रश्न मांडले, पण काहीच फायदा झाला नाही”, अशी व्यथा देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी मांडली.

दुस-या क्रमांकाचे न्यायाधीश जस्टीस चेलमेश्वर म्हणाले की, ‘पत्रकार परिषद घेताना आम्हाला मुळीच आनंद होत नाही. मात्र मागील दोन महिन्यांपासून न्यायव्यवस्थेत जे काय सुरु आहे, ते व्यथित करणारे आहे. सुप्रीम कोर्ट प्रशासनाचे कामकाज सुरळीत होत नाही. याबाबत आम्ही सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांना पत्रही लिहिले. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. सरन्यायाधीशांना लिहिलेले पत्र सार्वजनिक करणार आहोत. आम्ही आमचा आत्मा विकला, असे आम्हाला भविष्यात कोणीही बोलू नये. न्यायव्यवस्था टिकली नाही, तर लोकशाही टिकून राहणार नाही.’

गुरातमधील सोहराबुद्दीन शेख चकमक प्रकरणी सुनावणी करणारे विशेष सीबीआय कोर्टाचे न्यायाधीश बी एच लोया यांच्या मृत्यूप्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी होणार आहे. त्याबाबत आजची पत्रकार परिषद घेण्यात येत आहे का, अशी विचारणा न्यायमूर्तींना केल्यानंतर त्यांनी त्यावर ‘होय’ असे उत्तर दिले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.