सीडीआर प्रकरणी आयशा श्रॉफसह कंगणाही पोलिसांच्या रडारवर

0

कॉल डिटेल्स रेकॉर्ड (सीडीआर) प्रकरणात अभिनेता नवाजुद्दिन सिद्दीकीनंतर आता अभिनेता जॅकी श्रॉफची पत्नी आयशा आणि बॉलिवूड अभिनेञी कंगणा रनोट पोलिसांच्या रडारवर आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, आयशा श्रॉफने मित्र साहील खानच्या कॉल्सची माहिती मागवली होती. साहील आणि आयशा यांच्यात आर्थिक देवाणघेवाणीवरुन वाद झाले होते. त्याने पोलीस ठाण्यापर्यंत धाव घेतली होती. त्यामुळे आयशाने साहीलचे कॉल रेकॉर्ड मागवले होते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. आज ठाणे पोलीस आयशा श्रॉफची चौकशी करणार असल्याचे सांगितले जात आहे

तसेच, कंगणानेही कॉल रेकॉर्ड मागवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मात्र कंगणाने कुणाचे कॉल रेकॉर्ड मागवले हे अद्याप समोर आलेले नाहीये. देशातील पहिली महिला हेर रजनी पंडित यांना अटक झाल्यानंतर राजकीय आणि बॉलिवूडमधील दिग्गज संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. ठाणे गुन्हे शाखेने कॉल डिटेल रेकॉर्डच्या खरेदी-विक्री प्रकरणात देशातील पहिली महिला गुप्तहेर रजनी पंडित यांना अटक केल्यानंतर मोठे रॅकेट उघड होत आहे.

सीडीआर लीक प्रकरणात ठाणे पोलिसांच्या हाती आतापर्यंत अनेक महत्त्वाचे धागेदोरे लागले आहेत. अनेक टेलिकॉम कंपन्यांसह पोलिसही चौकशीच्या घे-यात होते. आतापर्यंत 7 मोबाईल कंपन्या, 4 विमा कंपन्या संशयाच्या भोव-यात आहेत. तसेच, व्होडाफोन, एअरटेल, एअरसेल, आयडिया, टाटा, जिओ आणि यूनिनॉर या 7 टेलिकॉम कंपन्यांच्या मोबाईल नंबरचे सीडीआर आरोपींनी पैसे देऊन खरेदी केले होते. त्यावेळी पोलिसांनी सांगितले होते की, टेलिकॉम कंपन्यांना माहिती असल्याशिवाय कोणत्याही मोबाईल नंबरचे सीडीआर म्हणजेच कॉल डेटा रेकॉर्ड मिळू शकत नाही. त्यामुळे पोलिस आता टेलिकॉम कंपन्यांची चौकशी केली जाणार आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.