साबरमती आश्रमात नेतन्याहू यांनी पत्नीसह चालवला चरखा

0

भारत दौऱ्यावर असलेले इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आज (१७ जानेवारी) अहमदाबादेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह नेतन्याहू यांनी सपत्नीक साबरमती आश्रमाला भेट दिली. याठिकाणी त्यांनी महात्मा गांधींच्या स्मृतीला अभिवादन करून नेतन्याहू यांनी पत्नीसह चरखा चालवला. त्यानंतर मोदी, नेतन्याहू आणि त्यांच्या पत्नीने पतंगबाजीचा आनंद घेतला.

अहमदाबाद विमानतळावरुन मोदी आणि नेतन्याहू यांच्या रोड शोला सुरुवात झाली आहे. 8 किलोमीटरचा रोड शो दोन्ही देशांचे पंतप्रधान बंद कारमधून करत आहेत. तसेच देव ढोलेरा गावातील आय क्रिएशन या स्टार्ट अप प्रदर्शनालादेखील भेट देणार आहेत. येथे दोघेही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बनसांकाठा येथील सुईगाम तालुक्याला मोबाइल वॉटर डिझलायनेशन व्हॅन देतील.

नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर अहमदाबाद हे शासकीय परदेशी पाहुण्यांसाठी हॉट डेस्टिनेशन बनले आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.