सलमानने दिली बर्थडे पार्टी, कतरिनासह हे कलाकार आले पार्टीला

0

सुपरस्टार सलमान खानचा आज 52 वा वाढदिवस आहे. सलमानने मंगळवारी रात्री पनवेल येथील त्याच्या फार्महाऊसवर वाढदिवसाची पार्टी दिली. यावेळी त्याची एक्स गर्लफ्रेंड व अभिनेत्री कतरीना कैफ आणि ‘टायगर जिंदा है’चा दिग्दर्शक अली अब्बास जफरसह काही मित्र या पार्टीमध्ये दिसले.

मात्र कतरिना सलमानच्या या पार्टीला उशिरा पोहोचली. कारण ती मंगळवारी रात्री मुंबईतील लोअर परळ येथे अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीचे रिसेप्शन गेली होती. त्यामुळे तिला सलमानच्या बर्थडे पार्टीला येण्यास उशीर झाला. नुकताच सलमान आणि कतरिनाचा ‘टायगर जिंदा है’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे वाढदिवसाच्या पार्टीसोबतच त्याला चित्रपटाचे यशही सेलिब्रेट करायचे होते. त्यामुळे त्याने काल रात्रीच्या बर्थडे पार्टीमध्ये कतरीनाची बराचवेळ वाट पाहिली. या चित्रपटाने पहिल्या चार दिवसांत 150 कोटींची कमाई केली आहे.

सलमानच्या या पार्टीला कतरीना कैफसह अली अब्बास जफर, अनिल कपूर, निर्माता साजिद नाडियाडवाला, मौनी रॉय, डेजी शाह, सोनाक्षी सिन्हा, बॉबी देओल, बाबा आजमी, प्रफुल्ल पटेल व सलमानची खास मैत्रीण लुलिया वंतूर तसेच टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीदेखील पोहोचला होता.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.