सलमानने ट्विटरवर रिलीझ केले मेहुणा आयुषच्या ‘लव्हरात्री’चे पोस्टर 

0

सलमान खानने आज ‘लव्हरात्री’ चित्रपटाचे पोस्टर ट्विटरवर रिलीझ केले आहे. या चित्रपटातून सलमान मेहुणा आयुष शर्माला बॉलिवूडमध्ये लाँच करत आहे. तसेच अभिनेत्री वरिना हुसैन देखील या चित्रपटातून पदार्पण करत आहे. सलमान खान फिल्म्सच्या बॅनरखाली ‘लव्हरात्री’ चित्रपटाची निर्मिती केली जात आहे. 21 सप्टेंबरला ‘लव्हरात्री’ प्रदर्शित होत आहे.


सलमानने मागील आठवड्यात एक ट्वीट करुन सर्वांना एक खुश खबर दिली होती. त्याच्या या वृत्तामुळे चाहत्यांमध्ये आनंदाची लहर आली होती. ‘मुझे लडकी मिल गयी’ त्याच्या या एका ट्वीटने सोशल मीडियावर बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. मात्र अखेर ही मुलगी ‘लव्हरात्री’साठी मिळाली होती असे समोर आल्यानंतर सलमानच्या चाहते काहीसे नाराज झाले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिराज मिनावाला करत असून त्याचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट आहे. यापूर्वी त्याने फॅन, गुंडे, जब तक है जान, गुंडे या चित्रपटांचे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे.

आयुष शर्मासाठी हा मोठा ब्रेक मानला जात आहे. 2014 मध्ये सलमानची बहीण अर्पिता खान आणि आयुष शर्माचे लग्न झाले होते. त्यांना अहिल हा एक मुलगासुद्धा आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.