सनी लिओन झाली दोन मुलांची आई !

0

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनने चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. सनी दोन मुलांची आई झाली आहे. दोन मुलांच्या आगमनाने सनी आणि पती डेनियल वेबरच्या घरी पुन्हा एकदा आनंदाचे वातावरण पसरले आहे. परंतु सनी सरोगसीद्वारे आई झाली आहे, कि तिने दोनही मुलांना दत्तक घेतले आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाहीये.

मागील वर्षी लातूरमधून सनी आणि डॅनिएल वेबरने केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरणमधून (कारा) निशा नावाच्या 21 महिन्यांच्या मुलीला दत्तक घेतले होते. त्यानंतर सनी पुन्हा दोन मुलांची आई झाली. तिने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करुन आनंद व्यक्त केला आहे. दोन्ही मुलांची नावे अॅशर सिंग वेबर आणि नोआ सिंग वेबर अशी आहेत.

सनीने शेअर केलेली पोस्ट…

‘देवाची मर्जी! २१ जून २०१७ रोजी आम्हाला समजले आम्ही अल्पावधीतच तीन मुलांचे पालक होऊ शकतो. आम्ही निर्णय घेतला आणि प्रयत्न सुरु केले. अनेक वर्षांनी आमचे कुटुंब अॅशर सिंग वेबर, नोआ सिंग वेबर आणि निशा कौर वेबर यांच्या रुपाने पूर्ण झाले आहे. काही आठवड्यांपूर्वी आमच्या मुलांचा जन्म झाला. परंतु आमच्या डोळ्यात आणि हृदयात ते अनेक वर्षांपासून जिवंत होते. देवाने आमच्यासाठी खास योजना आखली होती, त्यामुळेच आम्हाला हे कुटुंब मिळाले. आम्ही तीन सुंदर मुलांचे पालक झालोय, असे सनीने शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.

 

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.