संभाजी भिडे व मिलींद एकबोटेंना उदयनराजे भोसलेंनी पाठीशी घालू नये – संभाजी बिग्रेड

0

भिमा कोरेगाव प्रकरण अचानक घडलेले नाही. तर सरकारच्या माध्यमातुन मनोहर उर्फ संभाजी भिडे व मिलींद एकबोटे यांनी पुर्वनियोजित कट रचुन घडवून आणलेले आहे. अशा दहशतवादी गुन्हेगांराना छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पाठीशी घालु नये. उदयनराजे हे छत्रपतीचे वारसदार आहे. आम्ही त्यांचा आदर करतो, परंतु त्यांनी छत्रपती पदाचा गैर वापर करु नये, अशी संभाजी बिग्रेडची भुमीका असल्याचे संभाजी बिग्रेडचे प्रदेश प्रवत्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी प्रसिध्दी प्रत्रकारव्दारे कळविले आहे.

भिमा कोरेगाव येथे जो प्रकार घडला त्यांच्या प्रतिक्रीया राज्य भर आल्या दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. ती शांत करण्याचे काम आम्ही ३ तारखेला पुढाकार घेऊन केले. यापुर्वी आम्ही मराठा सेवा संप व ३२ कक्षाच्या माध्यमातुन गेल्या २८ वर्षापासुन समाज प्रदोधन करुन सामाजिक सलोखा प्रस्तापित करण्याचे कार्य करित आहोत त्यामुळेच अ‍ॅड.प्रकाश आंबेडकरांच्या भुमिकेला आम्ही पाठिंबा दिला व शांततेचे अवाहन केले. कारण फोडा आणि राज्य करा हे आर.एस.एस. व त्याच्या विविध संघटना करित आहे. भिडे, एकबोटेच्या माध्यमातुन हा सरकार पुरस्कृत दहशतवाद आहे.

१८१८ ला इंग्रज-मराठा जे युध्द झाले त्या युध्दात पेशवांच्या जातीवादी वागणुकीमुळे पेशव्याच्या बाजुने कुणीही लढायला तयार नव्हते. त्यामुळे पेशवे नेस्तनावूत झाले, ते युध्द सन्मानासाठी झालेले होते. परंतु ते युध्द मराठा विरुध्द महार असे झाल्याचे खोटे सांगण्याचे काम भिडे व एकबोटे करित आहे. त्यामुळे सामाजिक तेढ निर्माण होत आहे. त्या युध्दात २२ महार, १८ मराठे, ८ मुसलमान असे विविध जातीधर्माचे मावळे शहिद झालेले होते.

१९२७ ला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी भेट दिली होती. त्यानंतर २००२ पासुन मराठा सेवासंघाने बहूजन म्हणजे मराठा सर्व एकत्र आणण्याचे कार्य केले सर्व बहूजनांनी एकत्र यावे एम फॉर्मूला म्हणजे मराठा, महार, मांग, मारवाडी, मुसलमान व सर्व बहूजनांनी ब्राम्हणवादाच्या विरोधात एकत्र येण्याची गरज आहे. असे आम्ही मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातुन सातत्याने सांगत आहोत, त्यामुळे सामाजिक सलोखा मोठ्या प्रमाणावर निर्माण झाला होता, परंतु गेल्या ५-६ वर्षापासुन काही समाज विघातक घटना मनुवादी घडुन आणण्याचे काम करीत आहे. त्यामुळे भिमा कोरेगाव या परिसरात जो स्थानिक लोकांचा गैरसमज झालेला आहे. तो दुर करण्यासाठी छत्रपती उदयनराजेंनी पुढाकार घ्यावा. त्यासाठी त्यांनी सातारा सोडावे आम्ही त्यांच्यासोबत फिरायला तयार आहोत. त्या परिसरात घरोघर जाऊन संयुक्त कार्यक्रमासाठी स्थानिक लोकांना विश्वास देणे आवश्यक आहे. त्याच बरोबर समाधीचे एकत्रीत येऊन पुनर्जीवनही करावे लागेल. या कार्यासाठी आम्ही उदयराजेसोबत येण्यास तयार आहोत परंतु भिडे, एकबोंटेना पाठिशी घालून नविन वाद उभा करु नये.

त्यांच्यावर सातारा, सांगली, कोल्हापूर या ठिकाणी अनेक जातीय दंगली घडविल्याचे गुन्हे दाखल आहेत, तडीपारीच्या नोटीससुध्दा आहेत, याची माहिती उदयनराजेंनी पोलिसांकडून घ्यावी कारवाईच्या दृष्टीने प्रयत्न करावे. कारण अशा गुन्हेगारांना आपल्यासारख्या जबाबदार व्यक्तीने पाठीशी घातल्यामुळे त्यांची हिम्मत वाढत जाते. यापुर्वीही अनेक राजकरण्यांची त्यांना पाठिशी घातले आहे त्यामुळे सामाजिक वातावरण दुषित झाले आहे, भिडेंनी आजपर्यंत बहुजन तरुणांची डोकी भडकवून दंगली घडून आणल्या आहेत. अनेक तरुणांचे आयुष्य, संसार उध्वस्त केले आहेत.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.