संभाजी भिडेंना अटक करा, अन्यथा मोर्चा काढू – प्रकाश आंबेडकर

0

कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी संभाजी भिडे यांच्या अटकेबाबत भारिपचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सरकारला इशारा दिला आहे. २६ मार्चपर्यंत भिडे यांना अटक केली नाहीतर विधानभवनावर मोर्चा काढू, असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी विधान भवनात जाऊन हा विषय मांडला. मागील दोन दिवसांपासून संभाजी भिडे यांच्या अटकेबाबत विरोधक सभागृहात गप्प होते. परंतु मिलिंद एकबोटे यांना अटक झाल्यानंतर आज त्यांनी विधान परिषदेत संभाजी भिडे यांना अटक करण्याची मागणी केली. त्याबाबतच्या गदारोळाने विधान परिषदेचे कामकाज तब्बल १५ मिनिटांसाठी तहकूब केले होते.

१ जानेवारी २०१८ रोजी भीमा-कोरेगावमध्ये शौर्यस्तंभाला अभिवादन करण्यासाठी गेलेल्या नागरिकांवर सणसवाडीत दगडफेक करण्यात आली होती. या दगडफेकीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे गुरुजी यांनी दिलेल्या चिथावणीनंतर कोरेगाव-भीमा येथे दंगल उसळली असा त्यांच्यावर आरोप आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.