संघ 3 दिवसांत सैनिक तयार करु शकतो, मोहन भागवतांचे वादग्रस्त वक्तव्य

0

देशसेवेसाठी सैनिक तयार करण्यासाठी 6 ते 7 महिने लागतात, परंतु संघ 3 दिवसांत जवान तयार करु शकतो, असे वादग्रस्त वक्तव्य राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यावर सर्वत्र टिका होत आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेससह आपनेही टीका केली आहे. भागवतांनी सैनिकांचा अपमान केला असून त्यांनी माफी मागावी अशी मागणी एनसीपी नेते नवाब मलिक यांनी केली आहे. भागवतांच्या वक्तव्यावर देशभरातुन टीका होत आहे, यावर संघाने स्पष्टीकरण देत सांगितले, की ‘मोहन भागवत यांना कोणत्याही प्रकारे संघ आणि भारतीय सैन्याची तुलना करायची नव्हती. मोहन भागवत यांना केवळ संघ किती शिस्तबद्ध संघटना आहे हे अधोरेखित करायचे होते,’ असे स्पष्टीकरण संघाकडून देण्यात आले आहे.

काय म्हणाले मोहन भागवत –

मुझफ्फरपुर येथे रविवारी (11 फेब्रुवारी) आयोजित कार्यक्रमात संवाद साधताना सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले, ‘सैनिकांना देशसेवेसाठी तयार करण्यासाठी 6 ते 7 महिने लागतात. परंतु देशाला गरज पडली तर 3 दिवसांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसवेक सज्ज होऊ शकतात. ही आमची क्षमता आहे. देशाच्या इतर कोणत्याही संघटनेत ही क्षमता नाही. संघ ही लष्करी संघटना नाही. पण देशाला गरज असेल तेव्हा सैनिकांच्या आधी आम्ही तयार होऊ.’

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.