श्रीदेवीच्या अंत्यदर्शनासाठी ऐश्वर्या, अजय देवगण, माधुरी दिक्षितसह पोहोचले हे कलाकार 

0

श्रीदेवी यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी लोखंडवाला येथील सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लबमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांच्या पार्थिवावर दुपारी ३.३० वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत. मंगळवारी रात्री ९.३० वाजता पार्थिव दुबईहून मुंबईमध्ये खासगी विमानाने आणण्यात आले.

सध्या लोखंडवाला येथील सेलिब्रेशन क्लबच्या बाहेर चाहत्यांनी मोठी गर्दी केली आहे. तसच श्रीदेवी यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी बॉलिवूडचे कलाकारदेखील हळूहळू दाखल होत आहे.

ऐश्वर्या राय बच्चन, जया बच्चन, रेखा, उर्वर्शी रौतेला, तब्बू, जया प्रदा, अर्जुन रामपाल, हेमा मालिनी, ईशा देओल, सोनम कपूर बॉयफ्रेंडसह पोहोचली, फराह खान, मनिष पोल, संजय कपूर, अजय देवगण, काजोल, माधुरी दिक्षित पतीसह पोहोचली, जॅकलीन फर्नांडीस यांसह अनेक कलाकार उपस्थित आहेत.

श्रीदेवी-बोनी कपूर यांचा भाचा मोहित मारवाहच्या लग्न सोहळ्यासाठी दुबईला गेले होते. शनिवारी (24 फेब्रुवारी) हॉटेलमधील बाथटबमध्ये बुडून त्यांचा मृत्यू झाला.

सुमारे २ दिवसांच्या चौकशीनंतर मंगळवारी दुबई पोलिसांनी पार्थिव कुटुंबीयांना दिले. बोनी व अर्जुन कपूर सायं. ७ वाजता दुबईहून पार्थिव घेऊन निघाले.

श्रीदेवी यांचे पार्थिव मंगळवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास लोखंडवाला स्थित ‘ग्रीन एकर्स’ या निवासस्थानी आणण्यात आले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.