शिवसेनेला भाजपची राज्यसभेच्या उपसभापती पदाची ऑफर

0

मित्रपक्षासोबत वाढलेला दूरावा कमी करण्यासाठी भाजपने हालचाली सुरु केल्या आहेत. राज्यसभेचे उपसभापती पद शिवसेनेला देण्याविषयी सध्या चर्चा रंगली आहे. भाजपने नाराज मित्रपक्ष शिवसेनेला ही ऑफर दिल्याचे सांगितले जात आहे.

मात्र याबाबतचा अंतिम निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेसचे जेष्ठ नेते प्राध्यापक पी.जे. कुरअन यांचा राज्यसभेच्या उपसभापती पदाचा कार्यकाळ संपत असल्याने या पदावर नवीन उपसभापतींची निवड होणार आहे. हे पद मित्रपक्षाला मिळावे यासाठी भाजप प्रयत्न करत आहे.

शिवसेनेचे संजय राऊत, राजकुमार धूत व अनिल देसाई हे तिघे राज्यसभेत खासदार आहेत. या तिघांमध्ये संजय राऊत जेष्ठ असल्याने त्यांना हे पद दिले जाईल, अशी चर्चा सध्या राजकिय वर्तुळात सुरु आहे.

 

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.