शिवसेनेचे माजी नगरसेवक अशोक सावंत यांची निर्घृण हत्या

0

मुंबईमधील शिवसेनच्या माजी नगरसेवकाची धारदार शास्त्राने हत्या करण्यात आली. अशोक सावंत असे त्यांचे नाव असून ते कांदिवली येथून दोनवेळा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. रविवारी (७ जानेवारी) रात्री 11 वाजेच्या सुमारास घरी जात असताना बाईकस्वारांनी त्यांच्यावर धारधार शस्त्राने हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या सावंत यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते, पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सावंत यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले आहे.

सावंत यांना मागील काही दिवसांपासून खंडणीसाठी धमक्या येत होत्या. त्यांनी याबाबतची तक्रार पोलिसांत दाखल केली होती. या खंडणीसाठीच त्यांची हत्या झाल्याचा पोलिसांना संशय आहे. दहशतवाद विरोधी पथकातील एसीपी सुभाष सावंत हे त्यांचे भाऊ आहे.

अशोक सावंत रात्री घरी परतत असताना त्यांच्या समता नगर इथल्या इमारतीबाहेर दबा धरून बसलेल्या दोन हल्लेखोरांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. सावंत यांना रूग्णालयात नेईपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. सीसीटीव्हीत सावंत यांचे मारेकरी कैद झाले असून यातील एका आरोपीची ओळख पटली आहे. जग्गा असे या आरोपीचे आहे. तो कुख्यात गुंड असल्याचे सांगितले जात आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.