शिल्पा शिंदेवर वादग्रस्त कमेंट केल्याने या विनोदवीरावर उडाली टीकेची झोड
विनोदवीर राजू श्रीवास्तवने बिग बॉसची स्पर्धक आणि टीव्ही अभिनेत्री शिल्पा शिंदेवर वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यासाठी त्याला फेसबूक पोस्टवरून माफी मागण्याची वेळ आली आहे. कलर्स या वाहिनीवर सुरु झालेल्या ‘एंटरटेन्मेंट की रात’ या शोमध्ये राजू श्रीवास्तवचा विनोदी स्वभाव खूप दिवसानंतर पाहायला मिळाला. यावेळी त्याने बिग बॉस ११ मधील लोकप्रिय स्पर्धक शिल्पा शिंदेवर आपत्तीजनक विनोद करून तिची खिल्ली उडवली.
त्यानंतर राजूला सोशल मीडियावर प्रेक्षकांच्या नाराजीचा सामना करावा लागला. या पोस्टने राजूची चांगलीच नाचक्की झाली. अखेर त्याला फेसबूक पोस्ट लिहून सर्वांची माफी मागावी लागली.
‘एंटरटेन्मेंट की रात’ या शोमध्ये मुबीनने शिल्पाची भूमिका केली होती. यावेळी शिल्पा बनलेल्या मुबीनला राजू म्हणाला, ‘तू चॅनलचे आभार मानायला हवे, त्यामूळे तुला एवढा मान-सन्मान मिळाला. नाहीतर तुझ्या नावे कोणी चिठ्ठीही लिहणार नाही. बिग बॉसच्या घरात आई बनून फिरत आहेस. आई बनण्याची एवढीच हौस आहे तर बाहेर ये शक्ती कपूर तुझी वाट पाहत आहे. माझ्या चपला मी का खराब करु?’
राजूच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर शिल्पाच्या फॅन्सनी राजूला सोशल मीडियावर चांगलेच धारेवर धरले. राजूने यावर माफी मागुन कलर्स चॅनलने डायलॉग एडीट केल्याचा आरोप लावला आहे.
राजू म्हणतो, प्रिय मित्रांनो, मी तुमच्या कमेंट्स वाचून हैराण झालो आहे, मला याबाबत माझी बाजू मांडायची आहे.
मी कोणत्याही महिलेचा अपमान करु शकत नाही. हा विचारही मी कधी करु शकत नाही. मी एक पती आणि एका मुलीचा बाप आहे. महिलांचा आदर करतो. शिल्पा माझी को-स्टार होती. माझ्या नजरेत तिच्यासाठीही तेवढाच आदर आहे. माझे डायलॉग एडीट करून चॅनल निर्मात्याने चुकीच्या पद्धतीने दाखविले आहेत.
माझा मुळ डायलॉग असा होता, ‘तुला आई होण्याची एवढीच हौस असेल तर बाहेर पड, शक्ती कपूर तुझी वाट पाहतोय, सिनेमात आई बनविण्यासाठी. नवाजुद्दीनदेखील सिनेमात तुला आपली आई बनविण्यास तयार आहे.” मी कलर्स चॅनल्सवर नाराज आहे. त्यांनी माझा डायलॉग चुकीच्या पद्धतीने दाखविला.