शाहरुख खानच्या ‘झिरो’ चित्रपटाचा टीझर रिलीज
शाहरुख खानच्या ‘झिरो’ चित्रपटाचा टीझर रिलीज
तनु वेड्स मनु, तनु वेड्स मनु रिटर्न्स आणि रांझणा या चित्रपटांचे दिग्दर्शकन करणारा दिग्दर्शक आनंद एल रॉय आणि बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान ही जोडी नव्या वर्षात चाहत्यांना एक हटके गिफ्ट देणार आहेत. प्रेक्षकांना हे गिफ्ट नव्या वर्षाच्या अखेरीस मिळणार आहे असल्याचे दिसते. या जोडीचा ‘झिरो’ हा नवीन चित्रपट २०१८ या वर्षाच्या २१ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
स्वतः शाहरुखने नुकतेच या चित्रपटाचे नाव ट्विटरवर घोषित केले आहे. ‘माझ्या चित्रपटाच्या तिकिटांसाठी चाहते रांग लावून उभे आहेत. मग तमाशाही पूर्ण झालाच पाहिजे’, असे म्हणून शाहरुखने चित्रपटाचा टीझर ट्विट केला आहे. टीझरमध्ये शाहरुख अगदी वेगळ्याच रूपात दिसत आहे. तो टीझरमध्ये ‘हमको तुमपे प्यार आया’ या जुन्या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. हा टीझर प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारा आहे.
शाहरुख आणि आनंद एल राय यांच्या या चित्रपटात शाहरुखसोबत अनुष्का शर्मा आणि कतरिना कैफही आहेत. या दोघींसोबत शाहरुखने यापूर्वी ‘जब तक है जान’ या चित्रपटात काम केले आहे. ३१ डिसेंबरला शाहरुखने चाहत्यांना नववर्षाच्या शुभेच्छा देऊन त्याच्या नव्या चित्रपटाची घोषणा १ जानेवारीला संध्याकाळी ५ वाजता होईल, असे ट्विट करून सांगितले. त्यामुळे सोमवारी दिवसभर सोशल मीडियावर #Kal5BajeSRK हा हॅशटॅश ट्रेंडमध्ये होता.