शहराच्या प्रतिष्ठेशी नंदुभाऊचा खेळ.! अखेर पहाटे ‘भरत’ला पैसे देणारी दळभद्री महानगर पालिका

0

शहराच्या प्रतिष्ठेशी नंदुभाऊचा खेळ.!

अखेर पहाटे ‘भरत’ला पैसे देणारी दळभद्री महानगर पालिका

औरंगाबादच्या संत एकनाथ रंगमंदिराचे वाभाडे यापुर्वी अनेक मोठ्या कलावंतांनी काढले आहेत. त्या रंगमंदिराची आणखीही दूरूस्ती आमच्या महानगर पालिकेने पुर्ण केलेली नाही. त्यात महानगर पालिकेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला ‘सही रे सही’चा शो ठेवला आणि लाडक्या भरत जाधवला त्यांच्या मानधनाच्या रक्कमेसाठी थेट पहाटे पाचपर्यत वाट पहायला लावणारी ही महानगर पालिका दळभद्री म्हणावी लागेल.

तर त्याचे असे झाले की, आधी पत्नीच्या आणि नंतर स्वतःच्या गळ्यात महापौरपदाची माळ घालून घेतलेले नंदूशेट घोडेले. आपली कारकिर्द लोकांच्या (औरंगाबाद(मध्य) विधान सभेसाठी स्वतः इच्छूक असल्याने) लक्षात रहावी यासाठी प्रयत्नशील आहेत.म्हणून महापौरपदाची माळ गळ्यात पडल्या-पडल्या सिक्सर मारण्याच्या तयारीत होते.

त्यांना संधीही होतीच ती महानगर पालिकेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाची. त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन ‘सही रे सही ‘ नाटकाच्या आयोजनात सक्रिय सहभाग नोंदविला. अभिनेते भरत जाधव यांच्याशी त्यांनी स्वतः बोलून नाटकाचे मानधन तारीख सगळे काही निश्चित केले. आठ जानेवारीला हे नाटक झालेही. त्या दिवशी सकाळी भरत जाधव औरंगाबादेत आले. त्यांचा अगदी नंदूशेट घोडेले यांच्या स्टाईलने पाहूणचार झाला. नाटक चांगले झाले आणि प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद दिला.


आता स्टोरीचा क्लायमॅक्स भरत जाधव यांच्या भेटीला नंदूशेट आले. त्यांचे कौतुकही केले. त्याचवेळी भरत जाधव यांच्या मानधनाच्या प्रश्न होता. नंदूशेटनी त्यांच्या स्टाईलने अरे ते भरतजींचे ते देऊन टाका असे सांगून नंदूशेटनी रंगमंदिर सोडले. नंदूशेटच्या कार्यकर्त्याने मानधनाच्या रक्कमेचे पाकिट भरत जाधव यांना दिले. हुशार अभिनेते असणाऱ्या भरत जाधव यांनी त्या कार्यकर्ताला थांबवले आणि पैसे मोजायला सुरू केले. भरत जाधव यांच्याशी चर्चा करून जे मानधन निश्चित केले होते, त्यापेक्षा ते पैसे कमी होते. अतिशय शांतपणे भरत जाधव यांनी थेट नंदूशेटना फोन लावला आणि मला जी रक्कम सांगितली होती ती रक्कम मला जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मी संत एकनाथ सोडणार नाही, असे सांगत गांधीगिरी सुरू केली. महापालिकेच्या स्टाईलने अर्धी रक्कम देऊन भरत जाधव यांना धडकवुन नेण्याच्या प्रयत्न केला गेला. या नाटकाच्या आयोजनात नियमीत नाटकाचे व्यवस्थापन पाहणारे नव्हते कारण याच्या आयोजनात थेट महापौर नंदूशेटचा सहभाग होता.त्यामुळे त्यांनाच हा तिठा सोडविणे भाग होते. अखेर नंदूशेटनी धावाधाव केली, पहाटे पाच वाजता नंदूशेटचा कार्यकर्ता सगळी रक्कम घेऊन पोहोचला. त्यानंतर भरत जाधव त्यांची कार घेऊन मुंबई कडे रवाना झाले. ही घटना खरी आहे.

संत एकनाथ रंगमंदिराच्या गैरसोईबद्दल अभिनेत्री मुक्ता बर्वे यांनी सोशल मिडियावर व्हीडिओ व्हायरस करून महानगर पालिकेच्या इज्जतीचे लक्तरे वेशीवर टांगली. त्यानंतर नंदूशेटनी संत एकनाथच्या दुरुस्तीचे अश्वासन दिले. त्यानंतर भरत जाधव यांना ठरलेले मानधन न देऊन पुन्हा एकदा प्रथम नागरिक असणाऱ्या नंदूशेटनी पुन्हा मुंबईच्या कलासृष्टीत ‘दिवे’ लावले आहेत. त्यामुळे पुन्हा महानगर पालिकेच्या कार्यक्रमाला असे कलावंत येतील की नाही? असा प्रश्न निर्माण केला आहे. तसा झेंडाच नंदूशेटनी गाडला आहे.

पण आपण बोल्या ठरल्यापणाने वागले नसालं तर ज्या कलाकार पाहटे पाचपर्यंत ताटकळत राहवे लागले असेल, त्या कलाकारा काय वाटत असेल ?, काय मतं झाले आसेल औरंगाबाद विषयी ? इथल्या मनपा, नेत्याविषयी? हा सभ्य मानसाने विचार करण्याचा विषय आहे.मात्र या घटणेने औरंगाबादकरांची किती नाचक्की झालीच. एका प्रसिध्द, उत्कृष्ट अभिनेत्यापुढे औरंगाबाद शहराची, इथल्या माणसाची, प्ऱशासनाची, गबाळ कारभाराची तसेच फुकटच्या चमकेगीरीचे वंगाळवाने प्रर्दशन झाले.

मनपाकडे पैशे नसतील तर कोणी सांगीतले होते असे “नाटक” आयोजन करायचे. विशेष म्हणजे मनपाचा प्रगल्भ अभ्यास, माहिती असणाऱ्या नंदुभाऊकडून आशा कृतीची अपेक्षा नक्कीच नाही. महापौरांचे शहराची प्रतिष्ठा वाढवणे हे एक कामच असते. पाहुन्या माणसा समोरच तरी औरंगाबाद शहराची,  इतल्या माणसाची आब राखण्याचे काम करा महापौर साहेब.! इथल्या माणसाला बाहेर मुंबई पुण्याला गेल्यावर कसलेले कसले टोमे ऐकुन शरमेने मान खाली घालावी लागते याचा विचार केला  तर बर होईल आपण जेष्ठ आहात मनपात; तुमच्याकडून शहरवाशीयांच्या बऱ्याच अपेक्षा आहेत.. तुर्थच क्रमशः

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.