व्हिडिओकॉन कंपनीच्या कर्मचाऱ्यांना सक्तीची रजा

0

व्हिडिओकॉनच्या चितेगाव प्रकल्पातील शेकडो कर्मचाऱ्यांना ८ जानेवारीपासून १२ दिवसांची सक्तीची रजा जाहीर करण्यात आली आहे. या सक्तीच्या रजेमुळे कर्मचाऱ्यामध्ये खळबळ उडाली आहे. सक्तीची रजा का देण्यात आली, याची अधिकृत माहिती कंपनी व्यवस्थापनाने दिली नाहीये. त्यामुळे कर्मचाऱ्यांना धास्ती निर्माण झाली आहे. व्हिडिओकॉन उद्योग समूहाचे प्रमुख, खासदार राजकुमार धूत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मला विषयावर काहीही बोलायचे नाही, असे म्हटले.

चितेगावातील व्हॅल्यू रेफ-१ व सोकेश-२ या युनिटमध्ये फ्रिज तसेच वॉशिंग मशीन, मोबाईल, एसी आणि इतर घरगुती वस्तूंची निर्मिती केली जाते. येथे ६ हजार ४५९ कर्मचारी कार्यरत आहेत. दोन आठवड्यांपूर्वीच नवीन वर्षाच्या आगमनाचे कारण सांगून २८ डिसेंबर ते ५ जानेवारी २०१८ पर्यंत सुट्या देण्यात आल्या. ७ जानेवारी रोजी प्रत्येक युनिटमध्ये नोटीस लावून ८ ते १८ जानेवारीपर्यंत सुटी जाहीर केली. एवढी प्रदीर्घ सुटी सर्वांना देण्यामागचे नेमके कारण काय, याचा कोणताही उल्लेख नोटिसमध्ये नाही. या प्रकारामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.