विविध प्रश्नासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची मराठवाड्यात हल्लाबोल यात्रा – धनंजय मुंडे

0

हिंगोली – शेतकरी, सर्वसामान्य नागरिक, युवक व मराठवाड्याच्या विविध प्रश्नासाठी 16 जानेवारी पासून मराठवाड्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने हल्लाबोल यात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिली.

हल्लाबोल यात्रेच्या पूर्वतयारीसाठी रविवारी (७ जानेवारी) धनंजय मुंडे हिंगोली येथे आले होते. पक्ष कार्यकर्त्याच्या बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषदेत हल्लाबोल यात्रेची माहिती दिली.

कर्जमाफीची अंमलबजावणी नाही, बोंडअळीने कापूस पीकाच्या झालेल्या नुकसानीला मदत नाही, शेतमालाला हमीभाव सरकार दयायला तयार नाही, कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे. वीजेचा प्रश्न आणि मराठवाडयातील समस्यांकडे सरकारचे होणारे दुर्लक्ष, वाढती महागाई, बेरोजगारी या विरोधात आम्ही सरकारविरुद्ध पुन्हा एकदा हल्लाबोल करणार आहोत.

या हल्लाबोल यात्रेची सुरुवात १६ जानेवारीपासून तुळजापूर येथून होत आहे. दहा दिवसांच्या या यात्रेत १० दिवसांमध्ये दररोज 3 या प्रमाणे २८ सभांचे आयोजन केले आहे. मराठवाडयाच्या आठही जिल्यात दिवसाला ३ सभा घेतल्या जातील. तुळजापूरच्या आई भवानीच्या दर्शनाने या हल्लाबोल यात्रेची सुरुवात केली जाईल.

अशा होणार सभा –
या हल्लाबोल यात्रेत १६ जानेवारीला उस्मानाबाद जिल्हयात सकाळी ११ वाजता तुळजापूर, दुपारी ४ वाजता उमरगा, सायंकाळी ७ वाजता उस्मानाबाद, १७ जानेवारी सकाळी ११ वाजता भूम, दुपारी ४ वाजता पाटोदा, सायंकाळी ७ वाजता बीड, १८ जानेवारीला बीड जिल्हयात सकाळी ११ वाजता गेवराई, दुपारी ३ वाजता माजलगाव, सायंकाळी ७ वाजता अंबाजोगाई, १९ जानेवारीला लातूर जिल्हयात सकाळी ११ वाजता औसा, दुपारी ३ वाजता उदगीर, सायंकाळी ७ वाजता अहमदपूर, २० जानेवारीला सकाळी ११ वाजता लोहा, दुपारी ३ वाजता गंगाखेड, सायंकाळी ७ वाजता परळी, २१ जानेवारीला नांदेड जिल्हयात दुपारी १ वाजता उमरी, सायंकाळी ५ वाजता माहुर, २२ जानेवारीला हिंगोली, परभणी जिल्हयात सकाळी ११ वाजता हिंगोली, दुपारी ३ वाजता वसमत, सायंकाळी ७ वाजता परभणी, २३ जानेवारीला जालना, परभणी जिल्हयात सकाळी ११ वाजता पाथरी, दुपारी ३ वाजता सेलू, सायंकाळी ७ वाजता परतूर, २४ जानेवारीला जालना जिल्हयात सकाळी ११ वाजता घनसांगवी, दुपारी ३ वाजता बदनापूर, सायंकाळी ७ वाजता भोकरदन येथे सभा होणार असल्याचे मुंडे यांनी सांगितले.

या हल्लाबोल यात्रेत प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, पक्षाचे नेते आणि विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, पक्षाच्या नेत्या खा. सुप्रियाताई सुळे, पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री जयंत पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, महिला अध्यक्षा चित्राताई वाघ, युवक अध्यक्ष संग्राम कोते, सर्व आमदार, खासदार आदी महत्वाच्या नेत्यांसह आणि मराठवाडयातील पक्षाचे सर्व आमदार आणि विविध आघाडयांचे पदाधिकारी सहभागी होतील. या हल्लाबोल यात्रेचा समारोप औरंगाबादेत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या जाहीर सभेने 3 फेब्रुवारी रोजी होईल असेही ते म्हणाले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.