विराट कोहली आयसीसीचा ‘क्रिकेटर ऑफ द इअर’

0

आयसीसीने वार्षिक पुरस्कारांची घोषणा केली आहे. 2017 मधील टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला आयसीसीचा ‘क्रिकेटर ऑफ द इअर’ घोषित करण्यात आला आहे.

विराट कोहलीला ‘आयसीसी वन डे क्रिकेटर ऑफ द इयर’चा पुरस्कार जाहीर झाला असून गेल्या वर्षभरात कोहलीने तब्बल 6 शतके ठोकली आहेत. सध्याची त्याची वन डेची सरासरी 55.74 इतकी आहे. कोणत्याही वन डे खेळाडूची ही सर्वोत्तम सरासरी आहे.

दुसरीकडे टीम इंडियाचा फिरकीपटू यजुवेंद्र चहलला ‘टी ट्वेण्टी’तील कामगिरीबद्दल गौरवण्यात आले. चहलला ‘आयसीसी टी ट्वेण्टी परफॉर्मन्स ऑफ द इयर’चा पुरस्कार जाहीर झाला. चहलने गेल्या वर्षी बंगळुरुत झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या टी ट्वेण्टी सामन्यात 25 धावा देत 6 विकेट्स घेतल्या होत्या.

कसोटीतील सर्वोत्तम कामगिरीबद्दल ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथला सन्मानित करण्यात येणार आहे. स्मिथला ‘आयसीसी टेस्ट क्रिकेटर ऑफ द इयर’चा पुरस्कार जाहीर झाला. उदयोन्मुख क्रिकेटपटूचा पुरस्कार पाकिस्तानच्या हसन अलीने पटकावला. अफगाणिस्तानच्या राशीद खानला असोसिएट प्लेअर ऑफ द इयरचा मान मिळाला. तसेच पाकिस्तानी संघाला ‘फॅन्स मुमेंट ऑफ द इयर’चा पुरस्कार घोषित झाला आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.