विराट कोहलीला सासऱ्यांनी दिले खास ‘गिफ्ट’

0

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा गेल्या वर्षी लग्नगाठीत अडकले. लग्नाच्या काही दिवसांनंतर विराट दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर रवाना झाला. याच दरम्यान अनुष्काचे वडील निवृत्त कर्नल अजय शर्मा यांनी जावई विराटला एक खास गिफ्ट दिले आहे.

‘मुंबई मिरर’च्या माहितीनुसार, 3 फेब्रुवारी रोजी अनुष्काचे आई-वडील मुंबईत तेजस्वीनी दिव्या नाईक यांच्या ‘स्मोक अॅण्ड व्हिस्की’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला उपस्थित होते. यावेळी अनुष्काच्या वडिलांना हे पुस्तक आवडले. त्यांनी लगेच हे हे पुस्तक आपल्या जावयासाठी खरेदी केले. अजय शर्मा यांनी हे पुस्तक आपल्या जावयाला भेट म्हणून दिले आहे.

या पुस्तकात नात्यांवरील आधारित कविता लिहिल्या आहेत. यात एकूण 42 कविता आहेत. विराट आणि अनुष्का दोघांनाही कविता वाचायला आवडते.

त्यांनी लग्नातदेखील सूफी संत रूमी यांच्या कवितांचा संग्रह पाहुण्यांना रिटर्न गिफ्ट म्हणून दिला होता. दोघांनी 11 डिसेंबर रोजी इटलीत विवाह केला. त्यांनतर दिल्ली आणि मुंबईत जंगी रिशेप्शन पार्टी दिली होती.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.