विराट-अनुष्काने वरळीत घेतला अलिशान फ्लॅट

0

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने मुंबईतील वरळीमध्ये नवीन अलिशान फ्लॅट विकत घेतला आहे. विराट पत्नी अनुष्का शर्मासोबत नव्या घरात शिफ्ट होणार असल्याचे कळते. मात्र तोपर्यंत दोघांनी भाड्याने घर घेतले आहे. वरळीत भाड्यावर घेतलेल्या घरासाठी विराटला महिन्याला १५ लाख रु. मोजावे लागणार आहेत. या घरासाठी त्याने दीड कोटी रुपये डिपॉझिट भरले आहे.

वरळीत रहेजा लिजंड या चाळीस मजली इमारतीत टॉप फ्लोअरवर हा फ्लॅट आहे. २ हजार ६७५ चौरस फुटाचा हा फ्लॅट आहे. तसेच विराटने २४ महिने म्हणजे २ वर्षांसाठी हा फ्लॅट भाड्यावर घेतला आहे.

विराटने नुकताच या घरातल्या बाल्कनीला फोटो ट्विटर आणि इंस्ताग्रामवर शेअर केला आहे. त्याने या फोटोसह कॅप्शन लिहिले, कि ‘तुमच्या घराच्या बाल्कनीतून इतका सुंदर व्ह्यू दिसत असेल, तर ते सोडून दूर जावे वाटेल?’

विराटने २०१६ मध्ये वरळीत ‘स्काय बंगलो’ या प्रोजेक्टमध्ये फ्लॅट बुक केला होता, मात्र त्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले नसल्याने त्याला सध्या भाड्यावर घर घ्यावे लागले. त्याने विकत घेतलेले घर ८ हजार चौरस फुटाचे आहे. मागील वर्षी डिसेंबर महिन्यात विराट आणि अनुष्का लग्नगाठीत अडकले. लग्नानंतर विराटने मुंबईत शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.